Type Here to Get Search Results !

महिला बालकल्याण विभागाने दिली माहिती:लाडक्या बहिणींना 40 हजार कर्जाची योजना नाही

लाडकी बहीण योजनेतील महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार असून याबाबत सरकार प्रयत्नशील असून विचार सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडला काही दिवसांपूर्वी सांगितले. मात्र, महिला आणि बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कर्ज देण्यासाठी कोणतीही योजना तयार केली जात नाही, असे सांगण्यात आले. जर वित्त विभाग किंवा सहकार विभागाकडून यासंदर्भात काही योजना तयार केली जात असेल तर ती लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर येईल, असेही संबंधित विभागाचे अधिकारी म्हणाले. महिला आणि बालविकास विभागाचे म्हणणे आहे की, सर्व लाभार्थी महिलांना नियमितपणे १५०० रुपये मिळावेत ही त्यांची प्राथमिकता आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर हा हप्ता २१०० रुपयांपर्यंत वाढवायचा आहे. अशा परिस्थितीत महिला आणि बालविकास विभाग अशी कोणतीही नवीन योजना सुरू करण्याच्या मनःस्थितीत नाही. यामुळे आधीच सुरू झालेल्या योजनेत अडथळे निर्माण होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेवर महायुती सरकार सुमारे ४५ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक १० ते २५ हजारांपर्यंत कर्ज देणार आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mAvQrNl

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.