तेंदूपत्ता ताेडण्यासाठी जंगलात गेलेली आणखी एका महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. वाघाने हल्ला केला तेव्हा तिच्या आईवडिलांसह पतीही समोरच होता. त्यांनी वाघाला हुसकावण्यासाठी आरडाओरडही केली. मात्र ते तिचा बचाव करण्यात अपयशी ठरले. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मूल तालुक्यातील भादुर्णा बिटातील ७९३ मध्ये घडली. भूमिका दीपक भेंडारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. सोमवार, १२ मे रोजी भूमिका ितचे आई, वडील, काका, काकू व पतीसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी भादुर्णाच्या जंगलात गेली होती. तेंदूपत्ता तोडत असतानाच तिच्या पतीसमोरच वाघाने हल्ला केला. यात ती जागीच ठार झाली. घटनेनंतर मृतदेह उचलण्यास मृताच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृत महिलेच्या कुटुंबीयांची व नागरिकांची समजूत काढल्याने मृतदेह उचलण्यात आला. भाऊजी गावतुरे यांची मुलगी भूमिका हिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दीपक भेंडारेसोबत झाला होता. अापल्या पतीसह ती वडिलांकडे राहायला आली होती. उदरनिर्वाहासाठी दोघेही मिळेल ते काम करीत होते. सोमवारी सकाळी भादुर्णा बिटातील ७९३ मध्ये आईवडील, काका-काकू आणि पतीसोबत ती तेंदूपत्ता तोडत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने भूमिकावर हल्ला केला. यावेळी काही अंतरावरच असलेल्या आई, वडील आणि पतीने आरडाओरड करून तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. वाघ पळून गेला,परंतु वाघाच्या हल्ल्यात तिचा जीव गेला. या घटनेची माहिती वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी वनविभाग आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका कालच नागाळा येथे एका वृद्ध महिलेचा वाघाने जीव घेतल्याने नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृताचे कुटुंबीय आणि नागरिकांची समजूत घालत वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलण्याची, हमी दिली. तसेच मृताच्या कुटुंबीयांना रोख पन्नास हजाराची आर्थिक मदत केल्यानंतर वातावरण निवळले. पोलिस व वन अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक रविवारी मूल तालुक्यात नागाला येथील एक वृद्ध महिला व शनिवारी मूल तालुक्यातील शिंदेचाही तालुक्यातील मेंढा माल गावात तीन महिलांना वाघाने ठार केले होते. तीन दिवसांतील वाघाच्या हल्ल्यातील आजचा पाचवा बळी आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिक जोरदार मागणी करीत आहेत, परंतु वन विभाग मात्र बंदोबस्त करण्यास अपयशी ठरत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/2NRfhCz
वाघाच्या हल्ल्यात पतीसमोर पत्नी ठार:मूल तालुक्यातील घटना- 3 दिवसांत वाघाच्या हल्ल्यात 5 महिलांचा बळी
May 12, 2025
0