Type Here to Get Search Results !

राज्यात मंगळवार ठरला ‘अपघातवार’:तीन जिल्ह्यातील विविध अपघातात 9 ठार, 21 जखमी; नांदेडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

राज्यात मंगळवारचा दिवस ‘अपघातवार’ ठरला. एका दिवसात तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडलेल्या अपघातांमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. बुलढाणा येथे पहाटेच्या सुमारास अपघात घडला. चंद्रपुरात सायंकाळच्या सुमारास पिकअप आणि ट्रकच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर नांदेड जिल्ह्यातील एका अपघातात एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला. या घटनांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, रस्त्यांवरील वेग, ओव्हरटेकिंग आणि बेदरकारपणा ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिला अपघात हा बुलढाण्यातील नांदुरा शहराजवळ मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आर्टिगा कार आणि ट्रक यांची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, कारचा पत्रा कापून मृतांचे मृतदेह बाहेर काढावे लागले. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. ही दुर्घटना पहाटेच्या वेळी घडल्यामुळे रस्त्यावर प्रकाशाचा अभाव आणि वेगावर नियंत्रण नसणे, ही प्राथमिक कारणं समोर आली आहेत. देवदर्शनावरून परताना एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दिवसभरातील दुसऱ्या अपघातात नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील एकाच कुटुंबातील तिघांवर काळाले घाला घातला. लोकरवाडी येथील पवार कुटुंब देवदर्शनासाठी मध्यप्रदेशातील उज्जैन शिऊर येथे गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना त्यांच्या कारला अकोला-खामगाव रस्त्यावर अपघात झाला. या भीषण अपघातात देवराव पवार, बेबीताई पवार आणि निकेतन पवार यांचा मृत्यू झाला. तर कारचालक संतोष कदम आणि आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने लोकरवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. चंद्रपूरात टमटम आणि ट्रकची धडक; 3 ठार, 14 जखमी तिसरा अपघात हा चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात चितेगाव परिसरात मंगळवारी सकाळी घडला. प्रवाशांनी भरलेली काळी-पिवळी टाटा मॅजिक वाहन आणि शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन तीन जणांचा मृत्यू झाला असून 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सिंदेवाहीहून प्रवासी घेऊन मुलकडे निघालेल्या टाटा मॅजिक वाहनाला चितेगावजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने घडली. धडक इतकी भीषण होती की, मॅजिकचा चालक निर्दोष मोहूर्ले, 65 वर्षीय महिला प्रवासी मनाबाई सिडाम आणि आणखी एक प्रवाशी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मुल पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. जखमी प्रवाशांना तात्काळ मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात करणाऱ्या ट्रकचा चालक घटनास्थळीच पकडला गेला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ट्रक शासकीय धान्य घेऊन प्रवास करत होता. अपघाताची कारणमीमांसा सुरू असून अधिक तपास मुल पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hacsjEf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.