Type Here to Get Search Results !

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:लोणावळा-खंडाळा घाट होणार हद्दपार; मुंबई-पुणे प्रवासात 30 मिनिटे वाचणार; मिसिंग लिंक काम 94% पूर्ण

पावसाळ्यात दरडी कोसळणे, वाहतूक कोंडी आणि घाटातील चढउतारांमुळे अपघातांचा ब्लॅकस्पॉट बनलेल्या बोरघाटाचा पर्याय येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून यामुळे प्रवाशांचे १८ किलोमीटरचे अंतर व ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे खोपोलीहून थेट सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ निघता येणार असल्याने या मार्गावरील खंडाळा, लोणावळा हे घाटही बायपास करण्यात आले आहेत. पर्यायी मार्ग १३ किमीचा आहे तर खालापूर ते खोपोली या जुन्या एक्स्प्रेस वेवरील ६ किलोमीटरचे रुंदीकरण यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेमधील अंतर अधिक कमी होणार आहे. यात १.६८ किमीचा एक, ८.८७ किलोमीटरचा दुसरा असे दोन बोगदे, १९ किलोमीटरचा लांबीचा आठपदरी रस्ता असून दोन व्हायडक्ट बांधले आहेत. त्याचे ८४% काम पूर्ण झाले आहे. ऑगस्टपर्यंत काम पूर्ण, वेगळा टोल नाही चार खांबांवरील हा केबल ट्रे ब्रीज आहे. ९३-९४ टक्के काम पूर्ण झाले असून ऑगस्टपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खोपोलीनजीक एक्स्प्रेस वे आणि जुना पुणे हायवेवरील वाहने एकत्र येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी, अपघात, हवेचे प्रदूषण, वेळेचा अपव्यय हे सारे यामुळे वाचणार आहे. यासाठी वेगळा टोल नाही. - अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी मिसिंग लिंक अशी

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/rNp7nBt

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.