Type Here to Get Search Results !

अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडले:चार वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू, लातूरमधील घटनेने एकच खळबळ

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अवलकोंडा गावात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलीचं नाव शिवकन्या खेळकर असून, तिच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर घरात आणि परिसरात मन हेलावणारा आक्रोश पाहायला मिळाला. घटनेच्या वेळी गावाच्या शिवारातून माती वाहून नेण्याचे काम सुरू होते. गावातील अरुंद रस्त्यांवरून मातीने भरलेले ट्रॅक्टर ये-जा करत होते. त्याच वेळी अंगणात खेळत असलेल्या शिवकन्याच्या अंगावर ट्रॅक्टरचं चाक गेलं आणि ही भीषण दुर्घटना घडली. या प्रकरणातील ट्रॅक्टर चालक सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, गावात शोककळा पसरली आहे. अवलकोंडा गावात वस्तीमधील रस्त्यावर भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवल्याने चार वर्षीय शिवकन्या खेळकर हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. या भीषण घटनेनंतर ट्रॅक्टर चालक गौस बागवान हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून, दोषी चालकावर कडक कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शेवगाव ते पाथर्डी महामार्गावर देखील आज भीषण अपघात झाला. शेवगाव-पाथर्डी महामार्गावर रविवारी दुपारी भर पावसात दोन दुचाकीस्वारांमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. यावेळी मार्गावरून प्रवास करत असलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या लक्षात हा प्रसंग येताच त्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावर उतरून स्वतः मदतीसाठी पुढाकार घेतला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/sCvDpTF

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.