वाघाेली परिसरातील १० एकर जागा अपर्णा वर्मा नावाच्या दुबई येथे राहणाऱ्या महिलेच्या नावावर असून त्याची रेडीरेकनरनुसार किंमत तब्बल १०० काेटी रुपये आहे, तर बाजारमूल्य संबंधित किमतीच्या दुप्पट आहे. सदर जागा हडप करण्यासाठी तत्कालीन चंदननगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी त्यांचा मेहुणा व साथीदारासह अपर्णा वर्मा नावाच्या महिलेच्या जागी अर्चना पटेकर नावाची महिला उभी करून तीच अर्पणा वर्मा असल्याचे भासवून तिची बनावट कागदपत्रे काढली. या प्रकरणात दुबई येथून पुणे, मुंबईत वारंवार केसेसला न्यायालयात येणे शक्य नसल्याचा गैरफायदा घेत पाेलिस निरीक्षक लांडगे यांच्या टाेळीने तब्बल ७ काेटी रुपये स्वीकारले असल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे. तर, संबंधित दुबईतील महिलेकडून आणखी ११ काेटी रुपयांची मागणी करत दुसराच एक व्यक्ती या जागेवर खरेदीदार म्हणून उभा करत ब्लॅकमेलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे पसार झाला असून त्याचा शाेध पाेलिस पथके घेत आहेत. या गुन्ह्यात आणखी एक धक्कादायक बाब समाेर आली आहे की, संबंधित जागेच्या मालकी हक्कावरून वाद सुरू असताना जमिनीची सर्व कागदपत्रे ही राजेंद्र लांडगे याच्या ताब्यात हाेती. त्यावेळी तत्कालीन सहाय्यक पाेलिस निरीक्षक सिध्दनाथ खांडेकर यांच्या बनावट सहीने ते रजेवर असताना अपर्णा वर्मा यांच्या विरोधात सदर गुन्ह्यातील आराेपी आनंद भगत याच्या नावाने फिर्याद दाखल करून कार्यालयीन टिपणीवर बनावट स्वाक्षरी करत येरवडा सहायक पाेलिस आयुक्त व पाेलिस उपायुक्त परिमंडळ चार यांच्या परवानगीने बाेगस गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा खांडेकर यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून लांडगे याचा शाेध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दुबईत राहणाऱ्या अपर्णा वर्मांनी असे दिले पैसे या प्रकरणात तडजाेडीत अपर्णा वर्मा यांनी आनंद भगत यास ५० लाख रुपये, अर्चना पटेकर हिला ५० लाख, लांडगे यांचा मेव्हणा शैलेश ढाेंबरे यास दीड काेटी रुपये तर राजेंद्र लांडगे याला साडेचार काेटी रुपये दिले असल्याची माहिती वर्मा यांनी पाेलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात दाेन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात अपर्णा वर्मा यांचा तक्रार अर्ज, २०२३ मध्ये आनंद भगत याच्या सन २०२३ मधील तक्रारीवरून दाखल झालेला बनावट फसवणुकीचा गुन्हा, सहायक पाेलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर यांची बनावट सही केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पाेलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. यांच्या परवानगीने बाेगस गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा खांडेकर यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून लांडगे याचा शाेध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KM4Ijdq
लांडगे पसार:दहा एकर जमीन न हडपण्यासाठी पीआयने घेतले तब्बल 4.5 काेटी, रेडीरेकनरनुसार वाघोलीच्या जमिनीची किंमत 100 काेटी
May 21, 2025
0