Type Here to Get Search Results !

सामान घ्यायला घराबाहेर पडला, तो परतलाच नाही:लग्नाच्या आदल्या दिवशी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता, अमरावतीत खळबळ; शोधाशोध सुरू

अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेव मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, हा तरुण अमरावतीतील काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा आहे. वैभव मोहोड (वय 30) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. हरिभाऊ मोहोड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून सध्या मुलाचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या लग्न असलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता झाल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे. वैभव याचे लग्न 14 मे रोजी होणार होते. परंतु लग्नाच्या एक दिवस आधीच, म्हणजे मंगळवारी 13 मे सकाळपासून तो बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वैभव मोहोड हे शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी "सामान घेऊन येतो" असे सांगून ते घराबाहेर पडला. मात्र त्यानंतर ते घरी परतलाच नाही. बराच वेळ घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वैभवने सकाळीच एटीएममधून 40 हजार रुपये काढले होते. तसेच तो घरातून बाहेर पडताना सुमारे 90 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन गेला असल्याचेही समजते. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलिस करत आहेत. कोण आहेत हरिभाऊ मोहोड? हरिभाऊ मोहोड हे जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अभ्यासू नेते म्हणून हरिभाऊ मोहोड यांची ओळख आहे. ऐन लग्नाच्या एक दिवस अगोदर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7dLyI0M

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.