Type Here to Get Search Results !

चाइल्ड हेल्पलाइन नंबर आता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात:विद्यार्थ्यांना बालवयात मिळतील कौशल्य, वाहतूक नियमाचे धडे

यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम बदलला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमात बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाइल्ड हेल्पलाइन नंबर (१०९८) समाविष्ट करण्यात आला आहे. पहिलीच्या सर्व पाठ्यपुस्तकात हा क्रमांक असून पाचवीपर्यंतच्या भाषा आणि गणित विषयातही हा क्रमांक समाविष्ट करण्यात आला आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना बालवयापासूनच कौशल्य विकास शिक्षण आणि वाहतूक नियमाचे धडे गिरवता यावे यासाठी वाहतूक नियमांचाही यात समावेश करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल उच्च शिक्षणासह शालेय स्तरावरही करण्यात आले आहेत. मुलांना शालेय शिक्षणापासूनच सक्षम करण्यासाठी बदल करण्याचा यामागील हेतू आहे. दरम्यान वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना, पीडितांच्या संख्येत वाढ होते आहे. याबाबत शोषणाबाबत शालेय विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जागृती व्हावी म्हणून शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पाठ्यपुस्तकात चाइल्ड हेल्पलाइन नंबरचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच यंदा वाहतुकीचे नियम, हेल्मेटचा वापर, आठवडी बाजार, पिण्याच्या पाण्याचे महत्त्व, बागेत खेळताना कसे वावरावे, पाणी पिण्याची सवय आदींचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे. विद्यार्थ्यांना एसटी पास शाळेत मिळणार शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या सूचना परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार एसटीचे कर्मचारी कामाला लागले आहेत. २१ व्या शतकातील कौशल्यांचा विचार ही पाठ्यपुस्तके बालकेंद्रित दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून तयार केली असून विद्यार्थ्यांचा सक्रिय आणि सहभागात्मक शिक्षण या अनुषंगाने मजकूर, कृती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी २१ व्या शतकातील कौशल्यांचा विचार करण्यात आला असून कौशल्य विकास व कृतींवर आधारित आहेत. चाइल्ड हेल्पलाइन नंबर गरजेचा शाळेपासूनच विद्यार्थ्यांना ‘गुड टच बॅड टच’ हे शिकवणे गरजेचे आहे. त्याची माहिती शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना देणे गरजेचे. चाइल्ड हेल्पलाइन नंबर देखील पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे. -रेणुका कड, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्या.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/FfRvjzn

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.