Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या लूट:क्राईम ब्रँचचे नाव सांगून माजी आमदाराच्या पीएच्या भावाकडून सव्वा तीन लाखांचे दागिने लुटले

‘हम क्राईम ब्रांच वाले है, इस रोडपर डकैती हो रही है और तू सोना पहनकर जा रहा है’ म्हणत माजी आमदार आणि माजी मंत्री यांच्या स्वीय सहायकांच्या भावाला लुटल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. यावेळी त्यांच्या खिशात ३५ हजार रुपयेदेखील होते, परंतु कागदासोबत ते रुमालात गुंडाळलेले असल्याने बचावले. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. या घटनेत ज्यांना लूटले गेले, ते तिवस्याचे माजी आमदार प्रा. साहेबराव तट्टे आणि माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे स्वीय सहायक राहिलेले अजय पांडे यांचे थोरले बंधू गजानन शंकरराव पांडे होत. या मार्गावर त्यांची बीअर शॉपी व मद्य विक्रीचे दुकान आहे. व्यवसायातील रक्कम घेऊन ते गुरुदेवनगर येथून तिवसा येथे परत जात होते. दरम्यान मोझरी बायपासवरील वळणाजवळच्या पेट्रोल पंपासमोर त्यांना दुचाकीस्वार तिघांनी अडवले. अचानक मागून समोर आलेले हे दुचाकीस्वार हेल्मेट व काळे जॅकेट घातलेले होते. दोन रेसर दुचाकीने ते आले आणि त्यांनी गाडी थांबवून "तेरे को आवाज दे रहे थे, तू रुका क्यो नहीं, हम क्राईम ब्रांच वाले है, इस रोडपर डकैती हो रही है और तू सोना पहनकर जा रहा है, यह सोना घर पर रखना था, तेरे गले की चैन, हात की अंगुठी निकाल," असे म्हणून त्यांनी अंगावरील सर्व दागिने जवळ घेतले व लगेच पोबारा केला. काही लक्षात येण्याच्या आतच हा प्रकार घडल्याने गजानन पांडे (वय ५५ वर्षे) घाबरुन गेले. त्यांनी लगेच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली. दरम्यान पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या तीन भामट्यांनी एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. यामध्ये गजानन पांडे यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम सोन्याची चेन, ५ ग्रॅम साईबाबाचे लॉकेट व १० ग्रॅम सोन्याच्या अंगठीचा समावेश आहे. लूटमार झाल्यानंतर ते तिघेही अमरावती रोडने रेसर बाईकने वेगाने निघून गेले. पांडे यांच्या माहितीनुसार सदर तीनही भामटे हे धिप्पाड शरीर यष्टीचे, डोक्यात हेल्मेट व अंगात काळ्या रंगाचे जॅकेट घालून आले होते. त्यांच्याविरुद्ध कलम ३१८(४) व ३१९(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/YpS3xhR

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.