संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटाची अवघड नागमोडी वळणे चढून घामाघूम झालेल्या लाखो वारकऱ्यांचे झेंडेवाडी पुरंदर येथील विसाव्यावर स्वागत करण्यात आले. दमलेले हे वैष्णव येथे विसावतात. पालखी मार्गावर हडपसर-सासवड हा अवघड टप्पा आहे. महामार्ग रुंदीकरण कामांमुळे व पावसाच्या सरींमुळे हा खडतर टप्पा चालल्याने मोठी दमछाक होते. िनयोजनामुळे वाहतूक कोंडी नाही सासवड नगरपालिका, महसूल व आरोग्य, पोलिस विभाग सज्ज असल्याने वारकऱ्यांना त्रास झाला नाही. कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही. अवघी सोपानदेवनगरी माउलींच्या आगमनाने भक्तिरसात न्हाऊन निघाली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/RIzyi5E