Type Here to Get Search Results !

लव्ह जिहाद:नाशिक, जळगावात प्रेमाच्या जाळ्यात फसवून तरुणींच्या धर्मांतराचा प्रयत्न

एका मुस्लिम तरुणाने नाव बदलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत नोकरीच्या बहाण्याने दिल्लीच्या मुलीला नाशिकला आणून तिच्यावर अत्याचार केल्याची तर दुसऱ्या एका घटनेत एका तरुणीवर धर्मांतरसाठी दबाव टाकल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी सातपूर व सिडकाे पाेलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली येथे राहणाऱ्या हिंदू मुलीशी ओळख करून व आपले नाव राजू असल्याचे सांगून मोहंमद उजैर आलम (37) याने चांगली नाेकरी लावून देण्याच्या बहाण्याने दिल्लीच्या मुलीला 2013 मध्ये नाशिकला आणले. त्यानंतर दाेघे सातपूरच्या श्रमिकनगर येथील वृंदावन काॅलनी येथे राहण्यास आले. मी अनाथ असून माझे कुणी नाही, मी काेणत्या धर्माचा आहे, हेही माहीत नसल्याचे सांगून त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक सबंध ठेवले. यातून २०१६ मध्ये ती गर्भवती झाल्यानंतर तीला ताे मुस्लिम असल्याचे व त्याला भाऊ, आई असल्याचे समजले. मात्र आता आपण घरी परत जाऊ शकत नसल्यामुळे तिने मुकाट्याने त्याच्या साेबत राहून अन्याय - अत्याचार सहन केला. दरम्यानच्या काळात तिने एका मुलीलाही जन्म दिला. युवकाच्या धर्माची ओळख पटल्यानंतर त्याने युवतीला हिंदू धर्माप्रमाणे घरात पूजा करण्यास विराेध केला. तसेच बाहेर जाताना बुरखा घालण्यास सांगून युवतीला मारझाेड करून घरातून काढून देण्याची धमकी द्यायचा. दरम्यान, हिंदू मुलीवर मुस्लिम युवकाकडून अन्याय अत्याचार केला जात असल्याची माहिती परिसरातील युवकांना समजल्यानंतर त्यांनी युवतीला धीर देत सातपूर पाेलिस ठाणे गाठले. पाेलिसांनी युवतीच्या फिर्यादीवरून मुस्लिम युवकाविराेधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलांना ठार मारण्याची धमकी देत विवाहितेचा धर्मांतरासाठी छळ धर्मांतर कर, नाही तर तुझ्यासह मुलांना जिवे मारीन, अशी धमकी देत पतीने आपल्याच पत्नीचा छळ केल्याची धक्कादायक घटना अंबड पाेलिस ठाणे हद्दीत घडली आहे. यात केवळ मारहाणच नव्हे, तर आई-वडिलांची प्रॉपर्टी नावावर करण्याचा तगादा लावून तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला एका विशिष्ट धर्माचा स्वीकार करायला सांगत संशयिताने सुरुवातीला तिचा विश्वास संपादित केला, चांगली वागणूक देत असल्याचे भासवून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर संशयित पती व तिच्या सासरच्या व्यक्तींनी विवाहितेच्या वडिलांकडून वेळाेवेळी असे एकूण ६ लाख रुपये घेतले. फिर्यादी पहिल्यांदा गरोदर राहिल्यावर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी आरोपींनी जबरदस्ती करून अत्याचार केले. प्रसूतीनंतर विवाहितेने मुलीचे हिंदू नाव ठेवले, तसेच धर्मातरास प्रतिसाद न दिल्याने तिच्या पतीने सारडा सर्कल येथे तिचा रस्ता अडवून चाॅपर दाखवून आई-वडिलांची प्रॉपर्टी नावावर करून देण्यास, धर्मांतर करण्यास सांगत ऐकले नाही, तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही विवाहितेने धर्मांतरास नकार दिला. याचा राग आल्याने पतीने विवाहितेस दुसऱ्या वेळी गरोदर असताना मारहाण करून जमिनीवर पाडले व गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच देवदेवतांचा अवमान करून घरातील फोटो बाहेर फेकले. २०१९ ते दि. ३ जून २०२५ या कालावधीदरम्यान संशयिताने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्याकडील पैसेही उकळल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी घटना समाेर येणार सातपूर, सिडकाे आणि नाशिकरोड भागात अशाच घटना घडल्या असून या घटनांतील पीडित महिलांना न्याय देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पाेलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. तसेच, अशा प्रकारे फसवणूक करून धर्मांतर करण्याच्या घटना घडत असल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संर्पक साधावा. - याेगेश बहाळकर, जिल्हा संघटनमंत्री,विहिंप हा तर ‘लव्ह जिहाद’चा प्रकार हा प्रकार माहीत झाल्यानंतर मी पोलिस ठाण्यात गेलो होतो. संबंधित तरुणाने ज्या प्रकारचे संदेश आणि व्हिडिओ तरुणीला समाज माध्यमांवर पाठवले आहेत तो स्लो पाॅयझनिंगचा प्रकार असून हा ‘लव्ह जिहाद’ आहे याबद्दल शंका नाही. या प्रकारांना आळा बसला पाहिजे. अरविंद देशमुख, सरचिटणीस, जळगाव महानगर भाजप नाव बदलून लग्नाचे आमिष देत दिल्लीच्या तरुणीवर अत्याचार महाविद्यालयातील ओळखीच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आंतरजातीय विवाहासाठी तिला स्वत:च्या धर्माची शिकवण देणाऱ्या तरुणाने जळगावात येऊन तिला बुरखा घालायला लावला आणि बुरखा काढला तर जिवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी सकाळी हा प्रकार जळगाव शहरात घडल्याचे तरुणीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील एका गावातील ही २२ वर्षीय तरुणी आणि शेजारच्या गावातील फरहान हकीम खाटीक (२३) हे चोपड्यातील एकाच महाविद्यालयात शिकतात. प्रवासात त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यातून त्यांचे समाज माध्यमावर तरुणीला धमकावून बुरखा घालायला लावलाबोलणे होत होते. त्यात या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. धर्म वेगळे असले तरी प्रेम हे प्रेम असते असे सांगत तिला स्वत:च्या धर्माची शिकवण देणाऱ्या पोस्ट पाठवल्या. तिला आत्महत्येची धमकी देऊन लग्नासाठी होकार मिळवला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. बुधवारी ही तरुणी जळगावातील एका सुपर शाॅपमध्ये आली होती. तिथे येऊन फरहान आणि त्याचा मित्र जमील कुरेशी यांनी तिला बुरखा घालायला सांगितला. तिने बुरखा परिधान केल्यावर तिच्यासोबत त्यांनी खरेदी केली. बिलाचे पैसे देताना तिने बुरखा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा तिला विरोध करण्यात आला. त्यावेळी इतरांनी चौकशी केली तेव्हा या तरुणीने झाला प्रकार इतरांना सांगितला. त्यानंतर त्या दोन्ही तरुणांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तरुणीच्या फिर्यादीवरून त्या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला . हा लव्ह जिहादचाच प्रकार सिडकाे आणि सातपूर या दाेन्ही घटनांमध्ये पीडित महिलांच्या आई-वडिलांकडून त्यांच्यावर हाेत असलेल्या छळाच्या घटना समजल्या. त्यांना धीर देत संबंधित पाेलिस ठाण्यात धाव घेतली. यासंदर्भात, पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संर्पक साधून त्यांना घटना लक्षात आणून दिल्या. त्यानुसार दाेन्ही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार लव्ह जिहादचाच आहे. - श्रीकांत क्षत्रिय, बजरंग दल, शहर संयाेजक

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/YvtUhla

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.