Type Here to Get Search Results !

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:३६ दिवसांत जायकवाडीत १६ टीएमसी पाणी, ‘समन्यायी’तून नगर-नाशिकला दिलासा शक्य

जायकवाडी धरणांत ३६ दिवसांत १६ टीएमसी नवीन पाणी पोहोचले. या धरणात उपयुक्त जलसाठा ६५ टक्के झाल्यास नगर व नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच जायकवाडीचा उपयुक्त साठा ३८.४२ टीएमसीवर पोहोचला. सद्यस्थितीत नांदूर मधमेश्वर येथून गोदावरी नदीत ३९१३२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. पुढील २४ तासानंतर निळवंडेतूनही पाणी झेपावण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा जायकवाडी लवकर भरण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली. मेंढेगिरी अहवालातील शिफारशींनुसार जायकवाडी धरणातील खरीप वापरासह जिवंत पाणीसाठा १५ ऑक्टोबरला ६५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर नगर, नाशिक भागातील धरणसमुहातील पाणी सोडावे लागते. मागील वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणी सोडण्याची गरज भासली नाही. यंदा नगर व नाशिक पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नवीन पाण्याची आवक झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडेच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निळवंडेचा जलसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. भंडारदऱ्यातून सुरू असलेली आवक पाहता, पुढील २४ तासांत जलसाठा ८० टक्क्यापर्यंत जाईल. त्यानंतर निळवंडेतून प्रवरा पात्रात विसर्ग सोडला जाईल. तर दुसरीकडे गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर प्रकल्पातूनही जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडीचा जलसाठा ५०.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यापैकी धरणात सद्यस्थितीत उपयुक्त जलसाठा ३८.७६ टीएमसी आहे. उपयुक्त साठा साठा ६५ टक्के म्हणजेच ५० टीएमसीवर पोहोचल्यास समन्यायी धोरणानुसार पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. 70.42 भंडारदरा 69.84 निळवंडे 60 मुळा 100 सीना 100 आढळा 96 विसापूर 85 घोड धरण पाणलोटात जोरदार, मात्र लाभक्षेत्रात पावसाची उघडीप धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक सुरू आहे. तर धरणांच्या लाभक्षेत्रात मात्र, पावसाने गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिली आहे. खरिपात आतापर्यंत सुमारे ७२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. परंतू, पावसाने उघडीप दिल्यामुळे ही पिके संकटात आहेत. मागील २४ तासांत धरणांच्या पाणलोटातील भंडारदरा ७२ मिमी, निळवंडे २८, रतनवाडी ९८ मिमी पावसाची नोंद झाली. गोदापात्रात सतर्कतेचा इशारा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नांदूरमधमेश्वर धरणातील विसर्ग २४ तासांत ७९९७ ने वाढवून ३९ हजार १३२ वर पोहोचला आहे. टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदापात्रात सतर्कतेचा इशारा नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिला आहे. नांदूरमधमेश्वरमधून १८ टीएमसी पाणी सोडले निळवंडेत आवक सुरू आहे. २४ तासांत नदीपात्रात विसर्ग सुरू होईल. नांदूरमधमेश्वर व नगरच्या धरणातील विसर्गामुळे यंदा १५ ऑगस्टपूर्वी जायकवाडीतील उपयुक्त जलसाठा ६५ टक्क्यांवर जाईल. आतापर्यंत नांदूरमधमेश्वर व ओझरमधून सुमारे १८ ते १९ टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडले. त्यामुळे नगर व नाशिकची समन्यायीच्या कचाट्यातून सुटका होणार आहे. - उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6yrPDp1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.