Type Here to Get Search Results !

कार्तिकी यात्रा:श्री विठ्ठलाचे मुखदर्शन 24 तास, तर पदस्पर्श 22 तास; सर्व पूजांसह व्हीआयपी दर्शन बंद

कार्तिकी यात्रेनिमित्त रविवारी (दि. २६) विधिवत पूजन करत श्रींचा पलंग काढण्यात आला आणि विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू करण्यात आले. दरवर्षी यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. पंरपरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन २४ तास मुखदर्शन व २२.१५ तास पदस्पर्श दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहणार आहेत. ९ नोव्हेंबरपर्यंत (प्रक्षाळपूजा) २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ijNu964

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.