मुंबई भाजपच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी आता आभार प्रदर्शन अभियानाच्या नावाखाली थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती हाती घेतली आहे. वरकरणी माजी मंडळ अध्यक्षांचे आभार मानले जात असले तरी पडद्याआड शेलार यांनी मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांमधील भाजपचा खरा ‘ग्राउंड रिपोर्ट’ आणि ‘पॉलिटिकल स्कोरकार्ड’ जमा करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांचा जनाधार मर्यादित असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे असलेले शेलार यांच्या खांद्यावरच मुंबईतील वॉर्ड वाटप आणि निवडणुकीची धुरा सोपवण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सोमवारी शेलार यांनी या अभियानाचा श्रीगणेशा उत्तर मुंबईतून केला. माजी मंडळ अध्यक्षांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे आभार व्यक्त करताना ते म्हणाले की, माझ्या अध्यक्षपदाच्या काळात या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले, त्यांचे आभार मानणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. शिंदेसेनेवर दबाव आणणार या भेटींमध्ये अनेक वॉर्डांमधील भाजप कार्यकर्ते शेलार यांच्यासमोर एकच मागणी करत आहेत की, ज्या वॉर्डात भाजपची ताकद आहे तो वॉर्ड कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटासाठी सोडू नये. कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे दिवाळीनंतर वॉर्ड वाटपाच्या वेळी भाजप शिंदेसेनेवर दबाव आणणार हे स्पष्ट झाले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NUsRBcq
भाजप अध्यक्षपद सोडूनही मंत्री शेलार मनपात सक्रिय:जिथे ताकद तो वॉर्ड सोडणार नसल्याचा केला दावा
October 21, 2025
0