पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘जैन बोर्डिंग होस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालेले असताना, आता धर्मादाय आयुक्तांनी पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत जे व्यवहार झाले, ते जैसे थे ठेवण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले असून, एचएनडी जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यात धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे. जैन बोर्डिंग होस्टेलची जागा शिवाजीनगर येथे आहे, जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतांबर जैन बोर्डिंग सुरू आहे. १९५८ साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी या वसतिगृहाची उभारणी केली होती. विद्यमान विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छुक होते. समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री केल्याचा आरोप आहे. गोखलेसोबत भागीदारी नाही मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गोखले बिल्डरसोबत प्रकल्पात त्यांचा सहभाग २०२३ मध्येच होता. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यामधून बाहेर पडलो. माझा या व्यवहाराशी कोणताही संबंध २०२४ नंतर आला नाही. जैन बोर्डिंग हाऊसची खरेदी आणि विक्री गोखले एलएलपीद्वारेच झाली. त्यापूर्वीच मी बाजूला झालो होतो. माझे नाव त्या व्यवहारात नाही, असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावरून आता राजकारण होण्याची शक्यता आहे. मोहोळ यांनी मांडली बाजू केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. याबाबत मंत्री मोहोळ यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टी यांनी काही आरोप केले, पण ते सत्य परिस्थितीशी जुळत नाहीत. मी पुणेकरांच्या विश्वासासाठी स्पष्ट करतो की, मी जैन बोर्डिंग हाऊस व्यवहारात सहभागी नव्हतो. मी गोखले बिल्डरचा पार्टनर होतो. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सर्वकाही माहिती दिली असल्याचेदेखील मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/kdNR7PJ
पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहारास धर्मादाय आयुक्तांची स्थगिती:जमीन बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावर राजकारण
October 20, 2025
0