माझ्या बायकोकडे तू वाईट नजरेने पाहतोस, या संशयावरून मित्रानेच मित्राचा चाकूने वार करून आणि डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मृतदेह नायगाव तालुक्यातील गडगा–कौठा रोडवर पेट्रोलने जाळला. सकाळी अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघड झाली. झिशान लतीफ सय्यद (१७, रा. डोंगरगाव, ता. मुखेड) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी संशयित शेख अब्बास शेख रमजानसाब याला अटक केली. डोंगरगाव येथील शेख अब्बास शेख रमजानसाब आणि त्याच गावातील सय्यद झिशान सय्यद लतीफ हे दोघे मित्र होते. सय्यद झिशान हा बारावीचे शिक्षण घेत होता. मोहरमच्या दिवशी या दोघांमध्ये भांडण झाले होते, नंतर त्यांच्यातला वाद मिटला होता. १ ऑक्टोबरला शेख अब्बासने सय्यद झिशानला सोबत नेल्याचे अनेकांनी पाहिले. त्यानंतर सय्यद झिशान घरी आला नव्हता. मृताच्या कुटुंबीयांनी शेख अब्बासकडे विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. २ रोजी सकाळी झिशानचे वडील सय्यद लतीफ हे मुखेड पोलिस ठाण्यात गेले. त्या वेळी गडग्याजवळ युवकाचा मृतदेह सापडला, असे पोलिसांनी त्यांना सांगितले, तसेच मृताचे फोटोही दाखवले. फोटोवरून झिशानच्या वडिलांनी त्याची ओळख पटवली. घटनास्थळी आढळल्या दारूच्या बाटल्या घटनास्थळी चप्पल, दगड आणि दारूच्या बाटल्या आढळल्या. संशयित शेख अब्बास याने झिशानला सोबत घेत घटनास्थळी नेले. त्याने झिशानच्या छातीवर चाकूने वार केला. नंतर जिशान कोसळताच त्याच्या डोक्यात दगड घातला. नंतर दुचाकीचे पेट्रोल काढून झिशानचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/xCNAwMY
नांदेडला मित्राकडून मित्राचा खून; मृतदेह पेट्रोल टाकून जाळला:पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याच्या संशयातून झाला वाद
October 03, 2025
0