Type Here to Get Search Results !

हर्षदा शिरसाट यांना जि.प. निवडणूक लढणे अशक्य:निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 चीच यादी- प्रशासन

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी ४ नोव्हेंबर रोजी गोलवाडीचा पत्ता टाकत मतदार नोंदणीसाठी अर्ज केला. मात्र, निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी मतदार यादी अंतिम केली आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव आले असले तरी जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागातील निवडणूक त्यांना लढणे अशक्य असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. १ जुलै २०२५ च्या यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाल्यास ते बेकायदा ठरून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत, मुदतीनंतर हर्षदा शिरसाट यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याचा आरोप केला होता. बीएलओंवर राजकीय दबाव टाकून हर्षदा यांचे नाव यादीत घालण्यात आल्याचे दानवे म्हणाले. यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, माझ्या मुलीचे नाव २ ठिकाणी येऊ नये म्हणून स्थलांतर अर्ज केला आहे. आयोगाकडून प्रक्रिया समजून घेत अर्ज केला असल्याचे ते दिव्य मराठीशी बोलताना म्हणाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/m3CGDS8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.