एका बारावर्षीय शाळकरी मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील एका नराधम शिक्षकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धनाजी साेपान इंगळे (४८, ता.माेहाेळ) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील एका गावात २०२३ मध्ये ही घटना घडली होती. या खटल्यात डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाने दिलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी तसेच ५० हजार रुपये दंड ठोठावला. दहशतीमुळे काही पीडितांचा जबाबास नकार गुन्ह्याचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक विनाेद घुगे, पोलिस हवालदार राजू पवार यांनी केला. तपासादरम्यान आराेपीच्या दहशतीमुळे इतर पीडिता जबाबाच्या वेळी आल्या नाहीत. आम्हाला कोणताही जबाब द्यायचा नाही असे लिहून दिले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/M7tf9ZR
अल्पवयीन विद्यार्थिनीवर वर्गातच दुष्कर्म करणाऱ्या शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप:मोहोळ तालुक्यातील 2023 ची घटना, जिल्हा-सत्र न्यायालयाचा निकाल
November 13, 2025
0