सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील क्यूपिड लिमिटेड कंपनीत याआधीचा मालक व त्याची पत्नी यांनी करार लपवत अनियमित व्यवहारांमधून सुमारे २०० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. २०२३ मध्ये मालकी बदलल्यानंतर नवीन संचालक या प्रकारापासून अनभिज्ञ होते. मात्र, राजस्थानमधील एका भागीदार कंपनीने फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपनी व्यवस्थापकाने याआधीचा मालक व त्याच्या संचालक पत्नीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्यूपिड ही कंडोम, लुब्रिकंट्स आणि इन-विट्रो डायग्नोस्टिक्स (आयव्हीडी) किटचे उत्पादन करते. १९९३ पासून ती कार्यरत आहे. डब्ल्यूएचओ, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडकडून कंडोम पुरवठ्यासाठी पूर्व-पात्रता दर्जा मिळविणारी ही जगातील पहिली कंपनी आहे. संपूर्णपणे निर्यात होणारी उत्पादने कंपनीत बनविली जातात. २०२३ मध्ये मालकी हक्क बदलण्यापूर्वी तेव्हाचे मालक ओमप्रकाश छंगामल गर्ग व विणा ओमप्रकाश गर्ग दोन्ही (रा. नारनोल, हरियाणा, हल्ली मुक्काम, मनमंदिर, गुलमोहर कॉलनी, कुलकर्णी मंगल कार्यालयामागे, आनंदनगर, नाशिकरोड) यांनी २०१९ पासून आर्थिक व्यवहारांमध्ये जाणीवपूर्वक अफरातफर करून कंपनीचे व पर्यायाने भागधारकांचे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार जनरल मॅनेजर राजेश रतनलाल सुलतानिया (५६) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी दोघांच्या विरोधात अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक भरत जाधव तपास करत आहेत. मात्र, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाईल अशी शक्यता आहे. राजस्थानमध्ये कंपनीविरोधात गुन्हा विकास लाइफ केअर या भागीदार संस्थेने त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार निदर्शनास आणल्यानंतर राजस्थानमध्ये कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यासंदर्भात सेबीने नोटीस पाठवल्यानंतर नवीन संचालकांना गेल्या काळात झालेल्या घोटाळ्याची माहिती समजली. दिव्य मराठी इनसाइड- खोटे खर्च दाखवून लाटले पैसे भागीदारांचे दणाणले धाबे क्यूपिड ही शेअर मार्केट लिस्टेड कंपनी आहे. त्यामुळे सेबीने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावल्यानंतर भागीदारांचे धाबे दणाणले आहेत. नऊ महिन्यांत कंपनी अडचणीत सेबीच्या कारवाईनंतर नऊ महिन्यांत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अनेक देशांमधील कंपन्यांचे व्यावसायिक करार अडचणीत आल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/IsvCjGW
सिन्नरच्या कंपनीमध्ये करार लपवून 200 कोटींचा अपहार:आधीचे मालक ओमप्रकाश गर्ग यांनी केली अनियमिता
November 01, 2025
0