Type Here to Get Search Results !

शिर्डीत एक लाखावर भक्तांनी घेतले साईदर्शन:50 हजार भाविकांनी प्रसादालयात घेतला साबुदाणा खिचडी प्रसाद

कार्तिकी एकादशीनिमित्त शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्रद्धा आणि सबुरीच्या भूमीत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने हा स्थानिक उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त साई मंदिर परिसर भाविकांच्या विठ्ठल विठ्ठल, साईराम घोषणांनी दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासूनच साई दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दिवसभरात तब्बल १ लाखाहून अधिक भाविकांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबांच्या समाधीसमोर पांडुरंगाची प्रतिमा ठेवण्यात आली होती, ज्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत लहू महाराज डफाळे यांचे कीर्तन झाले. एकादशीनिमित्त साईबाबांच्या भोजन प्रसादालयात भाविकांसाठी मोफत साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला. दिवसभरात सुमारे ५० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मागील वर्षी ४५ हजार भाविकांनी प्रसाद घेतला होता, यंदा त्यात पाच हजारांची वाढ झाली आहे. २० हजार २४८ भाविकांना अन्न पाकिटेही वितरित करण्यात आली. प्रसादासाठी पन्नास क्विंटल साबुदाणा या प्रसादासाठी ५० क्विंटल साबुदाणा, ३४ क्विंटल शेंगदाणे, ७.५०० क्विंटल शेंगदाणा तेल, २ क्विंटल साखर आणि २३ क्विंटल बटाटे वापरण्यात आले. साईनगरीत दिवसभर भक्ती, उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले. दिवसभर सुरू असलेल्या सुकर दर्शन आणि महाप्रसादामुळे शिर्डी शहरात कार्तिकी एकादशीचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Rpan4yL

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.