तब्बल २५२ कोटी रुपयांच्या ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज जप्ती प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम उर्फ मोहम्मद सुहैल शेख याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे, अभिनेता-दिग्दर्शक सिद्धांत कपूर यांची मंगळवारी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षासमोर (एएनसी) ५ तास चौकशी केली गेली. सिद्धांत हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा पुत्र आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. मुख्य आरोपी मोहम्मद सलीम सुहैल शेख याला गेल्या महिन्यात दुबईतून भारतात आणण्यात आले आहे. चौकशीदरम्यान शेख याने दावा केला होता की, बॉलीवूड, फॅशन जगतातील काही व्यक्ती, एका राजकारण्यासह कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या एका नातेवाईकानेही भारत आणि परदेशात त्याने आयोजित केलेल्या रेव्ह पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला होता. या दाव्यांच्या पुष्टीसाठी एएनसीने सिद्धांत कपूर यांना समन्स बजावले होते . सिद्धांतला यापूर्वी २०२२ मध्ये बंगळूरू येथे मादक पदार्थांचे सेवनप्रकरणी ताब्यात घेतले होते. एएनसीने सिद्धांत कपूरला विचारले हे प्रश्न चौकशी झालेले मोठे चेहरे सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात एनसीबीने दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान व रकुल प्रीत सिंह यांच्यासह अनेक बड्या अभिनेत्रींची चौकशी केली होती; परंतु त्यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस आरोप सिद्ध झाले नाहीत, तसेच त्यांना अटकही झाली नाही. चौकशीसाठी आलेला सिद्धांत कपूर
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7oAyuGC
252कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात बाॅलीवूड अभिनेता सिद्धांत कपूरची 5 तास चौकशी:दुबईतील आरोपीच्या जबाबानंतर मुंबई पोलिसांनी बजावले होते समन्स
November 25, 2025
0