Type Here to Get Search Results !

लँडिंग चार्जेस माफी, प्राधिकरणाची मान्यता:छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी एअर एशियाची तयारी

चिकलठाणा विमानतळावर दोन वर्षे देशांतर्गत व विदेशी सेवेसाठी एअर एशियाला लँडिंग चार्जेस माफ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. अतिरिक्त इन्सेंटिव्ह आणि लँडिंग चार्जेस माफ केल्याने एअर एशियाचा प्रति लँडिंग एक लाख ते दीड लाख रुपयांचा फायदा होणार आहे. कंपनी आता इमिग्रेशन सुविधा प्राप्त झाल्यानंतर विदेशी सेवा सुरू करण्यास तयार आहे. छत्रपती संभाजीनगर येथून यापूर्वी विभागीय विमानसेवा सुरू झाली आणि नंतर बंद पडली. यात नागपूर ते छत्रपती संभाजीनगर, अहमदाबाद आदींचा समावेश होता. नाशिक विमानतळ ‘उडान’ योजनेत असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर - अहमदाबाद सेवा इंडिगोने बंद करून ती नाशिकहून सुरू केली. ‘उडान’ सेवेत विमान कंपनीला प्रवासी मिळाले नाहीत, तर त्याच्या भरपाईसाठी ठराविक रक्कम राज्य शासनाकडून अदा केली जाते. त्यामुळे विमान कंपन्या या योजनेतील शहरांना प्राधान्य देतात. एअर एशियाने पाठवला प्रस्ताव एअर एशियाने छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून सेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. विमानतळाचे सर्वेक्षणही केले. एअर एशियाला सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून अथवा विमानतळ प्राधिकरणाकडून हमी हवी होती. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर एशियासाठी नवी दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला. येथून प्रथम देशांतर्गत व नंतर इमिग्रेशन चेक सुविधेनंतर विदेशी सेवेसाठी विशिष्ट इन्सेंटिव्ह आणि लँडिंग चार्जेस माफ करण्यास मंजुरी मिळाली. दोन वर्षे सेवा दिल्यानंतर पुढच्या तिसऱ्या वर्षीही इन्सेंटिव्ह आणि लँडिंग चार्जेस माफी मिळू शकते. येथे होऊ शकते विमानसेवा सुरू कोविडपूर्वी येथून १८ विमानसेवा होत्या. मुंबई आणि दिल्ली मार्गावर प्रत्येकी ४ विमाने होती. आता अधिक मागणी असलेल्या शहरांसाठी विमानसेवा सुरू केली जाऊ शकते. अहमदाबाद, जयपूर, इंदूर, उदयपूर, नागपूर, पुणे या शहरांसाठी विमानसेवा सुरू करणे शक्य आहे. एकाच वेळी ८ विमाने थांबण्याची सुविधा उपलब्ध चिकलठाणा विमानतळावरून विविध शहरांसाठी स्लॉट उपलब्ध आहेत. पायाभूत सुविधा आहेत. कुठल्याही विमान कंपनीला तत्काळ सेवा सुरू करता येईल. धावपट्टी मोठी असून विमाने थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे. एकाच वेळी ८ विमाने येथे थांबू शकतात. - शरद येवले, संचालक, विमानतळ प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Xumi3nG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.