Type Here to Get Search Results !

मीच सीएम.. जनतेचा काॅमन मॅन- शिंदे:चीफ मिनिस्टर म्हटले की सोन्याची शिंगे थोडी येतात, फडणवीसांना टोला

नागरिकांनी चीफ मिनिस्टर म्हटल्यावर थाेडीच साेन्याची शिंगे येतात. मी सीएम अर्थात नागरिकांच्या मनातील काॅमन मॅन आहे. माझ्याकडे डीसीएम पद असले तरी नागरिक डेडिकेटेड टू काॅमन मॅन असल्याचे बाेलतात, असे सुनावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगूर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांना टोला लगावला. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचारसभा झाली. लाडकी बहीण याेजना बंद हाेणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. समृद्धी महामार्ग, एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सूट अशा योजनांचा त्यांनी उल्लेख केला. सत्तेसाठी काही जण वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा टोला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठाचे नाव न घेता त्यांनी लगावला. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तणाव आहे. सभेत शिंदे यांनी सत्तेत असाे किंवा नसाे, आम्ही काम करत असताे, माणसे कमवत असताे.त्यामुळे आम्हाला त्याचा फरक पडत नाही. २५ मिनिटांच्या भाषणात या वाक्याचा त्यांनी तीनदा उल्लेख केला. नगर परिषदेला निधी देणारे खाते माझ्याकडे, लक्षात ठेवा नगर परिषदांचा निधी नगरविकास खात्यातूनच दिला जाताे आणि हे खाते माझ्याकडे आहे, हे लक्षात ठेवा, असेही शिंदेंनी या वेळी सांिगतले. चौकात प्रचारसभा झाली. लाडकी बहीण याेजना बंद हाेणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. समृद्धी महामार्ग, एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सूट अशा योजनांचा त्यांनी उल्लेख केला. सत्तेसाठी काही जण वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा टोला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठाचे नाव न घेता त्यांनी लगावला. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तणाव आहे. सभेत शिंदे यांनी सत्तेत असाे किंवा नसाे, आम्ही काम करत असताे, माणसे कमवत असताे.त्यामुळे आम्हाला त्याचा फरक पडत नाही. २५ मिनिटांच्या भाषणात या वाक्याचा त्यांनी तीनदा उल्लेख केला. मी ऑपरेशन करतो तेव्हा समोरच्यालाही कळत नाही खासदार श्रीकांत शिंदे डाॅक्टर आहेत. मी डाॅक्टर नसलाे तरी छाेटे-माेठे ऑपरेशन करत असताे. मी जेव्हा ऑपरेशन करताे तेव्हा समाेरच्यालाही काही समजत नाही.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/XOebR7B

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.