Type Here to Get Search Results !

तोतया महिला आयएएसने अमित शाहांच्या पीएच्या नावाने फसवणूक केल्याचे उघड:अटकेची माहिती मिळताच तिचा अफगाणी मित्र-अन्य एकाचा मोबाइल बंद

तोतया आयएएस कल्पना भागवतचे कनेक्शन पाकिस्तान, अफगाणिस्तानपर्यंत पोहोचले असतानाच, आता या प्रकरणाला केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाचेही गंभीर वळण लागले आहे. हेरगिरीचा संशय असलेल्या या प्रकरणात गुरुवारी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी ५ तासांहून अधिक काळ कल्पनाची कसून चौकशी केली. तिच्या मोबाइलमध्ये ओएसडी टू होम मिनिस्टर ऑफ इंडिया या नावाने सेव्ह नंबरही बोगस असल्याचे उघड झाले. तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे खाजगी सचिव अभिषेक चौधरी यांच्या नाव, पदाचा गैरवापर केल्याचे समोर आले. केंद्रीय गृहखात्याच्या नावाचा वापर कशासाठी? शाह यांचे अतिरिक्त खाजगी सचिव अभिषेक चौधरी यांच्या नावाचा गैरवापर करून कल्पना आणि तिचा अफगाणी मित्र अशरफ तसेच अन्य एका व्यक्तीच्या संपर्कात होती. तिच्या अटकेची कुणकुण लागताच ते दोघेही मोबाइल बंद करून भूमिगत झाले आहेत. त्यांचा हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शोध घेतला जात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Ve67Jcy

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.