Type Here to Get Search Results !

15 वर्षीय मुलाच्या छेडछाडीला कंटाळून अकोल्यात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या:छेड काढणाऱ्याला बालसुधारगृहात पाठवून त्याच्या वडिलांना अटक

छेडछाडीला कंटाळून अकोल्यातील १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. ती इयत्ता सातवीत शिकत होती. तिच्या शाळेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी तिची सतत छेड काढत होता. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी छेड काढणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली. या मुलाच्या वडीलांना अटक केली. तिच्या आत्महत्येमागील मूळ कारणाचा तपास सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांनी सांगितले. दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यास करत बसते, असे सांगून ती स्वत:च्या खोलीत गेली. सायंकाळपर्यंत ती खोलीबाहेर आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी दरवाजा तोडला तिने छताच्या पंख्याला आेढणीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाळेतील एका अल्पवयीन मुलाकडून तिची छेड काढली जात होती, असा आरोप तिच्या वडिलांनी केला. दामिनी पथकाने कठोर उपाय करावेत : वडिलांची विनंती माझ्या मुलीला तिच्याच शाळेतील आठवीतील मुलगा त्रास देत असल्याची माहिती ‘त्या’ मुलाच्या वडिलांना ६ महिन्यांपूर्वीच मी फोनवरून दिली होती. त्यानंतरही पाहिजे तसा धाक त्याच्यावर कुटुंबीयांचा नव्हता. संबंधित शाळेच्या शिक्षकांनाही महिनाभरापूर्वी याची कल्पना दिली होती. पण त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. आमची मुलगी गेली, हा धक्का कधीही भरून निघू शकत नाही. मात्र भविष्यात शाळांमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी शाळा प्रशासनाने अधिक गांभीर्याने दखल घ्यावी, असा प्रकार यापुढे होऊ नये, यासाठी कठोर उपाय हवेत, ही माझी विनंती. - अल्पवयीन मृत मुलीचे वडील

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/FOVYd3p

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.