Type Here to Get Search Results !

प्रगतिशील शेतकरी:पारनेरमधील शेतकऱ्याने 8 एकरावर लावली 2500 चंदनाची झाडे, 15 वर्षांनी प्रति एकरी मिळेल कोट्यवधींचे उत्पन्न

चंदन शेती हा भारतातील शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी प्रयोग ठरत आहे. चोरीची अधिक भीती असल्याने या शेतीकडे बहुतांश शेतकरी वळत नाहीत. परंतु पारनेर तालुक्यातील गोरेगावचे शेतकरी अंबादास काकडे यांनी २०१६ मध्ये आठ एकर क्षेत्रावर चंदनाचा प्रयोग यशस्वी केला. विशेष म्हणजे चंदनाची झाडे चोरी जाऊ नयेत यासाठी होस्ट म्हणून घायपाताचे कुंपण त्याला करण्यात आले आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चंदनाला संरक्षित करण्याचा हा उत्तम पर्याय मानला जात आहे. चंदन शेतीचा प्रयोग म्हणजे पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन दीर्घकालीन, उच्च उत्पन्न देणाऱ्या वनस्पतीची लागवड. चंदन हे स्वतंत्रपणे अन्न शोषण करत नाही, त्यासाठी 'होस्ट' झाडांची गरज असते. काकडे यांनी हा प्रयोग वैज्ञानिक पद्धतीने राबवला. प्रथम, आठ एकरावर सुमारे अडीच हजार चंदनाची रोपे लावली. दोन झाडांमधील अंतर १२ फूट आणि दोन ओळींमधील अंतर १० फूट ठेवले, ज्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. सुरुवातीला तूर आणि शेवगा यांसारखी लहान होस्ट दिली, तर दोन-तीन वर्षांनंतर कडूनिंब, बाभूळ, सीताफळ आणि जांभूळ यांसारखी कायमस्वरूपी होस्ट लावली. चंदनाला संरक्षणाची मोठी गरज असल्याने, काकडे यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक संरक्षणाची व्यवस्था केली. प्रत्येक चंदनाच्या झाडाभोवती १० ते २० घायपाताची रोपे लावली. घायपात हे काटेरी वृक्ष असल्याने चोरांना झाडापर्यंत पोहोचणे कठीण होते – प्रथम घायपात काढण्यासाठी १०-१५ मिनिटे लागतात. यामुळे दुहेरी फायदा झाला. होस्ट मिळाला आणि सुरक्षा वाढली. हा प्रयोग राबवताना काकडे यांनी पारंपरिक पद्धतींचा अवलंब केला. एका एकरात ४०० ते ५०० झाडे पहिल्या चार-पाच वर्षांत शेणखत आणि हिरवळीचे खत भरपूर दिले, ज्यामुळे झाडांची वाढ वेगवान झाली. चंदनाला १० वर्षांनंतर गाभा तयार होतो आणि १५ वर्षांनंतर परिपक्व होतो. एका झाडापासून १०-१५ किलो गाभा मिळतो, ज्याचा २०२५ मधील दर १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे एका झाडापासून १ ते १.५ लाख रुपये उत्पन्न मिळते. एका एकरात ४०० ते ५०० झाडे लावता येतात, ज्यामुळे १५ वर्षांनंतर एकरी ४ कोटी रुपयांपर्यंत कमाई शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. मध्यम जमिनीतही चंदन लागवड यशस्वी पूर्वी चंदनाची लागवड फक्त जंगलात नैसर्गिकरित्या होत असे आणि तस्करीमुळे हा दुर्मीळ वृक्ष बनला होता. मात्र, २०१५ मध्ये भारत सरकारने आणि २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाने चंदन शेतीला परवानगी दिली. यामुळे शेतकरी या मौल्यवान वनस्पतीकडे वळू लागले. महाराष्ट्रात चंदन शेतीला प्रति एकर २० हजार रुपयांचे अनुदान मिळते, मात्र फक्त १०-१५ शेतकऱ्यांनी ते घेतले आहे. काकडे यांच्या प्रयोगाने दाखवले की, मध्यम जमिनीतही चंदन यशस्वी होऊ शकते. शेतकरी मोबाईल नंबर - अंबादास काकडे, गोरेगाव (पारनेर) - 9822274727

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JKHX8el

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.