विधवा मुली आणि सुनांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेण्याबाबत छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या ब्राह्मण महाकुंभात ठराव मांडण्यात येईल. शहरात प्रथमच ब्राह्मण महाकुंभ होणार आहे. २७ व २८ डिसेंबरला निपट निरंजनसमोरील जनेश्वर महादेव मंदिरात महाकुंभ होईल. आठ राज्यांतील प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. सर्व ब्राह्मण शाखांचे एकत्रीकरण या ठिकाणी होणार असून ‘एक ब्राह्मण ना शाखा ना भेद’ या संकल्पनेवर आधारित तीन दिवसांचे संमेलन होईल. यामध्ये शंभर प्रतिनिधी सहभागी होतील. ब्राह्मण समाजातील शाखाभेद सोडून सकल ब्राह्मण एक होण्यावर यामध्ये प्रस्ताव मांडण्यात येईल. उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समिती आणि सकल ब्राह्मण समाज छत्रपती संभाजीनगरतर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समितीच्या विजया अवस्थी म्हणाल्या, मिटकॉनचे सीईओ राजेश मिश्रा मार्गदर्शन करतील.प्रमुख पाहुणे म्हणून सनातन सेवा न्यासचे अध्यक्ष शिवओम मिश्रा आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले उपस्थित राहणार आहेत. या विषयांवर होईल मंथन
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wr6Auca
ब्राह्मण महाकुंभात विधवा मुली, सुनेच्या पुनर्विवाहाचा ठराव घेणार:छत्रपती संभाजीनगरमध्ये 27,28 डिसेंबरला आयोजन
December 23, 2025
0