मुदखेड तालुक्यातील जवळा (मुरार) येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. वडिलांचे दीर्घकालीन आजारपण व त्यातील आर्थिक विवंचनेला कंटाळून दोन्ही मुलांनी आई-वडिलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. शवविच्छेदन अहवालानंतर या धक्कादायक वास्तवाचा उलगडा झाला आहे. २५ डिसेंबर रोजी रमेश होनाजी लखे (५१) आणि त्यांच्या पत्नी राधाबाई (४४) यांचे मृतदेह घरात आढळले होते. मुले उमेश (२५) व बजरंग (२२) यांचे मृतदेह मुगट रेल्वेस्थानकाजवळ सापडले होते. सुरुवातीला पालकांनी आत्महत्या केल्याचा संशय होता. मात्र शवविच्छेदन अहवालात रमेश आणि राधाबाई यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. खुनानंतर टपरीचालकाला उठवून सुपारीची खरेदी घटनेच्या रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान उमेश आणि बजरंग मोटारसायकलवरून घरातून निघाले होते. त्यांनी गावातील एका पानटपरी चालकाला उठवून सुपारीची पुडी घेतली. “आम्हाला बाहेरगावी जायचे आहे,” असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7PY1O63
दोन्ही मुलांनीच आई-वडिलांना मारून नंतर स्वत:लाही संपवले:नांदेडच्या एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूचे गूढ उकलले
December 27, 2025
0