वीर बाल दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशातील २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(२०२५) गौरवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या डॉ. अनुप्रिया महर्षी यांचा १७ वर्षीय मुलगा अर्णव महर्षी यालाही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपतींनी २० बालकांना पुरस्कार’ प्रदान केले. शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या बालकांना उर्वरित गौरवण्यात आले. यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये ९ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. काय आहेत इनोव्हेशन १. ॲक्टीव्ह हॅड रिस्ट बॅड लकवाग्रस्त रुग्णांच्या हाताला हा बँड बांधला जातो. यामुळे हालचालींद्वारे रुग्णांचे पुर्नवसन करणे सहज होते. अशा रुग्णांना फिजिओथेरपी अत्यंत गुणकारी ठरते. त्याला सहकार्य करणारे हे उपकरण आहे. याला पेटंटही मिळाले आहे. मागील वर्षभरापासून एमजीएम फिजिओथेरपी रुग्णालयात ते रुग्णांवर वापरले जात आहे. २. फेअर चान्स सॉफ्टवेअर-फेअर चान्स हे सॉफ्टवेअर बनवले आहे. याद्वारे बोटांच्या हालचाली टिपल्या जातात. हे सॉफ्टवेअर एआय बेस्ड आहे. त्याचाही कॉपी राईट मिळवला आहे. सर्वोच्च आनंदाचा क्षण अपघातानंतर एका आईची स्थिती काय असू शकते याची प्रत्येकजण कल्पना करु शकतो. एकुलता एक मुलगा वाचेल की नाही, ही शाश्वती नव्हती. आज त्याच्या २ प्रयोगांची दखल घेतली गेली. याहूनही महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात हजारो लोक याचा फायदा घेतील. यातून त्यांचे आयुष्य आनंद होईल. त्याच्या या प्रयोगांची दखल घेऊन दिलेला हा पुरस्कार मी सर्वोच्च सन्मान मानते, असे डॉ. अनुप्रिया महर्षी यांनी म्हटले. पुरस्कार मिळाल्यानंतर अर्णवने ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रेरणादायी प्रवास सांगितला, तो त्याच्या शब्दांत... ‘१९ मे २०२२ रोजी संभाजीनगरातील डॉक्टरांच्या ग्रुपचा उत्तराखंडात भीषण अपघात झाला. यामध्ये मीदेखील होतो. ११ दिवस मी कोमात होतो. डाव्या डोळ्याची नस पूर्णत:खराब झाली. ६ दात तुटले. जबड्याची हाडे मोडली. शरीर पूर्णत: पॅरालाइज्ड झाले होते. गत ३ वर्षांत रुग्णालयांत उपचारांसाठी जाताना रुग्णांची परिस्थिती पाहून रिस्ट बँड बनवण्याची प्रेरणा मिळाली. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मला उत्तम उपचार घेता आले. ज्यांच्याकडे सुबत्ता नाही, त्यांनाही उत्तम जगता यावे, या प्रेरणेतून मी हे उपकरण व सॉफ्टवेअर बनवले. एमजीएम फिजिओथेरपी रुग्णालयात उपकरणाचा रुग्णांवर वापर सुरु आहे. अनेकांना फायदा होताना पाहतो हाच खरा पुरस्कार आहे’ सरवण सिंह (१०) ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये फिरोजपूरच्या ‘तारा वाली’ गावात शत्रूचे ड्रोन हल्ले होत असतानाही, सैनिकांपर्यंत रोज दूध, चहा, लस्सी पोहोचवून इतरांना प्रेरणा दिली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/W9N0C7c
सन्मान:अर्धांगवायू पीडितांसाठी एआय सॉफ्टवेअर, रिस्ट बँड विकसित करणाऱ्या संभाजीनगरच्या अर्णव महर्षीचा राष्ट्रपतींच्या हस्ते बाल पुरस्काराने सन्मान
December 26, 2025
0