Type Here to Get Search Results !

टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा आज राज्यव्यापी संप:सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चा, शाळाही बंद राहण्याची शक्यता

शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणाऱ्या निर्णयासोबत विविध मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शुक्रवारी (५ डिसेंबर) राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. संपासोबतच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरही शिक्षकांकडून मोर्चा काढला जाणार असल्याचे मुख्याध्यापक महामंडळाने स्पष्ट केले आहे. राज्य शिक्षण संस्थाचालक मंडळ आणि मुख्याध्यापक महामंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. या संपात राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाल्यास राज्यातील शाळाही बंद राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शालेय वेळापत्रकावर होऊ शकतो. विविध प्रलंबित मागण्यांबाबत मुख्याध्यापक महामंडळ आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांच्या काय आहेत प्रलंबित मागण्या राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये ही त्यातील मुख्य मागणी आहे. तसेच, १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करणे, तसेच शिक्षण सेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी. शिक्षकांनी आंदोलन करू नये- शिक्षणमंत्री संभाजीनगर | टीईटी अनिवार्यचा विषय सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आहे. २००९ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी असावी की नाही याबाबत काही मार्ग काढता येईल का? देशपातळीवरील हा निर्णय असल्याने इतर राज्यांचा निर्णय पाहून मार्ग काढू, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/oB68EA3

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.