पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. गेल्या वर्षी १९ मे २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात एका १७ वर्षीय मुलाने मद्यधुंद अवस्थेत चालवलेल्या पोर्शे कारने दुचाकीवरील दोन आयटी अभियंत्यांना चिरडले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, या अपघात प्रकरणात विलंबाने अहवाल देणे आणि कर्तव्य दुर्लक्ष केल्याबद्दल यापूर्वीच निलंबित असलेले येरवडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव मार्च २०२५ मध्ये गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर याबाबत कारवाई करण्यात आली. अपघात करणारा अल्पवयीन मुलगा सुधारगृहातून बाहेर या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुधारगृहातून सोडण्यात आले आहे, तर त्याची आई सध्या जामिनावर बाहेर आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी, त्याचे वडील, ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हाळनोर, कर्मचारी अतुल घाटकामळे, दोन दलाल आणि आदित्य अविनाश सूद, आशिष मित्तल आणि अरुण कुमार सिंग या अन्य तिघांसह एकूण ९ आरोपी अजूनही तुरुंगात आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7H4utWO
पोर्शे अपघात प्रकरण:कर्तव्यात कसूर केल्याने दोन पोलिस बडतर्फ
December 10, 2025
0