बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्याच्या मुदतीत म्हणजेच २ जानेवारी रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४५३ नामनिर्देशन पत्रे माघार घेण्यात आली आहे. तर, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. आता शनिवारी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्ह नेमून दिली जाणार आहेत. तसेच, निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजेच ३० डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. या २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची ३१ डिसेंबर २०२५ रोजी छाननी करण्यात आली. १६४ नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली. तर उर्वरित २ हजार १८५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत होती. या कालावधीत ४५३ नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यात आली. माघारीअंती स्पष्ट झालेल्या चित्रानुसार, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. आता ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. चिन्ह वाटप पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय कार्यालय / माघार घेतलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या याची माहिती पुढीलप्रमाणे - १) ए + बी + ई विभाग (RO २३) - १९ / ९२ २) सी + डी विभाग (RO २२) - ०५ / ४४ 3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) - २१ / ५० ४) जी दक्षिण विभाग (RO २०) - १४ / ५१ ५) जी उत्तर विभाग (RO १९) - १८ / १०९ ६) एफ उत्तर विभाग (RO १८) - २५ / ९३ ७) एल विभाग (RO १७) - २० / ७६ ८) एल विभाग (RO १६) - २४ / ७४ ९) एम पूर्व विभाग (RO १५) - ४१ / १२१ १०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) - ४४ / ९७ ११) एन विभाग (RO १३) - ३४ / ८८ १२) एस विभाग (RO १२) - १५ / ७० १३) टी विभाग (RO ११) - २४ / ७९ १४) एच पूर्व विभाग (RO १०) - २५/ ८७ १५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) - १२ / ५८ १६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) - १८ / ८२ १७) के पश्चिम विभाग (RO ७) - १८ / १०४ १८) पी दक्षिण विभाग (RO ६) - १४ / ५६ १९) पी पूर्व विभाग (RO ५) - २१ / ८१ २०) पी उत्तर विभाग (RO ४) - ११ / ६० २१) आर दक्षिण विभाग (RO ३) - १० / ८३ २२) आर मध्य विभाग (RO २) - ०७ / ३५ २३) आर उत्तर विभाग (RO १) - १३ / ३९ एकूण – ४५३/ १७२९
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GieZ8Up
1,729 उमेदवार लढवणार BMC निवडणूक:उद्या अंतिम यादी प्रसिद्ध होणार; चिन्ह वाटपही होईल, 453 नामनिर्देशन पत्रे मागे
January 02, 2026
0