Type Here to Get Search Results !

संभाजीनगरात अर्ज मागे घेण्यासाठी रंगले मनधरणी नाट्य:पक्षांकडून बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न; झोन कार्यालय परिसरात दिवसभर गर्दी

महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (२ जानेवारी) शहरात प्रचंड राजकीय खलबते पाहायला मिळाली. अधिकृत उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यात राजकीय पक्षांना संमिश्र यश आले. दुपारी तीनपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. झोन कार्यालय परिसरात राजकीय पक्षाचे उमेदवारच आपल्या विजयात अडथळा ठरण्याची शक्यता असलेल्या अपक्षांना माघार घेण्यासाठी विनवण्या करत होते. दरम्यान, २ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या उमेदवारांची उमेदवारी कायम ठेवली आहे. अनेक प्रभागांत बंडखोरी कायम राहिल्याने अधिकृत उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. उमेदवार नॉट रिचेबल काही ठिकाणी वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेत पक्षादेश मानल्याचे चित्र दिसले. यामुळे अधिकृत उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. काही प्रबळ बंडखोरांनी पक्षाचा दबाव टाळण्यासाठी नॉट रिचेबल राहणे पसंत केले. झोन ५ मध्ये ७३ अर्ज मागे झोन ५ कार्यालयात शुक्रवारी या प्रभागातून उद्धवसेनेचे सांडू श्रीखंडे, भाजपच्या विशाल खंडागळे आणि शिवसेनेच्या अश्विनी सतीश खेडकर यांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतला. ४ प्रभागात छाननीनंतर १८० अर्ज होते, त्यातून ७३ उमेदवारांनी माघार घेतल्याने १०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपच्या भदाणेंचे बंड झोन क्रमांक ४ मध्ये ५० अपक्षांनी अर्ज माघार घेतल्याने सध्या निवडणुकीच्या रिंगणात ९३ उमेदवार आहेत. भाजपमधून उमेदवारी न मिळालेले प्रशांत भदाणे यांनी आपला अर्ज कायम ठेवला. पक्षाकडून भदाणे यांची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. सुनेसाठी सासूची, पत्नीसाठी पतीची माघार पक्षाने ए, बी फॉर्म दिला नाही, म्हणून रुसून बसलेल्या महिला उमेदवाराने अपक्ष अर्ज भरला. अर्ज मागे घेण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असतानाही त्या अर्ज मागे घेण्यास तयार नव्हत्या. अखेर पतीच्या सांगण्यावरून आणि आश्वासनानंतर अर्ज मागे घेतला. या प्रभागातून ५५ उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे आता ९८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीचे चित्र स्पष्ट बंडखोरी रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी, अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बंडखोरीचा फटका नेमका कोणाला बसणार आणि याचा फायदा कोणाला होणार, याकडे आता लक्ष आहे. पक्षाच्या उमेदवारांवरही लक्ष स्मार्ट सिटीच्या झोन कार्यालयामध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराने माघार घेऊ नये म्हणून पक्षाचे वरिष्ठच झोन कार्यालयात तळ ठोकून होते. या पक्षाच्या नेत्यांनी अर्ज माघार घेऊ नये म्हणून हा त्यांना प्रकार करावा लागला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CBn2vA7

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.