Type Here to Get Search Results !

अट्टल चोरटा जेरबंद, अनेक गुन्ह्यांची कबुली:कुऱ्हा पोलिसांनी 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

कुऱ्हा पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे. गस्तीवर असताना संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गजानन फकीरा मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूररेल्वे) असे आहे. कुऱ्हा ते चांदूररेल्वे मार्गावरील अप्पर वर्धाच्या पडीक क्वॉटरजवळ दुचाकी (एमएच ४० बीएस ९१४८) घेऊन जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. त्यावेळी त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली आणि त्याच्याजवळ वायर कटरही सापडले. आरोपीकडून ४ पाणबुडी मोटर (किंमत ३२ हजार रुपये), ५ किलो तांब्याची तार (किंमत ५ हजार रुपये) आणि ६ नोझल (किंमत ५ हजार रुपये) असा एकूण ४२ हजार रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध यापूर्वी ४ ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ठाणेदार अनुप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय योगेंद्र लाड, जमादार उमेश वाघमारे, अनिल निंघोट आणि सागर निमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4e8t5E7

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.