नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे रविवारी सकाळी १० वाजता शेतात न्याहारी करत असलेल्या गोरख लक्ष्मण जाधव (४३) या शेतमजुरावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. या वेळी झटापटीदरम्यान कठडा नसल्याने मजूर आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले. दोघांचाही चाळीस फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेतातील महिलांनी आरडाओरड केल्याने इतर मजूर विहिरीभोवती जमले. त्यांनी विहिरीत पाहिले तेव्हा बिबट्या विद्युत पंपाच्या फाउंडेशनवर बसून होता. त्यामुळे बुडणाऱ्या मजुराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. वन विभागाने दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले. मात्र, बिबट्याला ठार मारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर दुपारी साडेतीन वाजता गोविंद तुपे यांनी विहिरीत उतरून जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला.यादरम्यान पिंजरा वारंवार पाण्यात बुडाल्याने नाकातोंडात पाणी जाऊन बिबट्याचाही मृत्यू झाला. फर्स्ट पर्सन - पाण्यातही बिबट्याने जाधव यांची मान सोडली नव्हती मी धावत आलो तेव्हा विहिरीतील फाउंडेशनचा आधार घेत बिबट्याने जाधव यांची मान सोडलेली नव्हती. पंजेही मारणे सुरूच ठेवले हाेते. काही वेळाने पकड ढिली झाल्याने जाधव पाण्यात बुडाले. - गणपत चव्हाणके, शेतमालक इनसाइड स्टाेरी- दाेन बालकांवरही याच बिबट्याने केला होता हल्ला शिवडे परिसरात याच बिबट्याने सकाळी दोन बालकांवरही हल्ला केला होता. त्यामुळे “आधी बिबट्याला ठार मारा, मगच मृतदेह बाहेर काढा,’ अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. पेंचमधील वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात सोडला बुलडाणा | पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या ३ वर्षांच्या नर वाघास मध्यरात्री ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले. शिकारी कौशल्य आत्मसात केल्यामुळे वनाचा अधिवास लाभावा यासाठी हे पाऊल उचलले. वनाचा अधिवास लाभताच या पट्टेदार वाघाने रेड्याची शिकार केल्याचे समोर आले. या वाघाचे नामकरण पीकेटी/ सीपी १ ठेवण्यात आले असून हा मूळ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील आहे. ६ महिन्यांचा असतानाच त्याची आई मृत पावली होती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PK8GemH
सिन्नरमध्ये बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला; दोघांचाही विहिरीत पडून मृत्यू:बिबट्याच्या भीतीने मजुराला वाचवण्यास कुणीही धजावले नाही
January 04, 2026
0