Type Here to Get Search Results !

वृषभ जाधव हत्या प्रकरण:आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

साताऱ्यातील करंजे येथील आंदेकर चौकात गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वृषभ जाधव याला कोयत्याने मारहाण करून खून केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याची फिर्याद मृत वृषभचा भाऊ श्रेयश दशरथ जाधव(वय २०,राहणार रविवार पेठ,सातारा) याने दिली असून यामध्ये भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आप्पा मांढरे यांच्यावर पुर्वी केलेल्या गोळीबाराच्या संशयावरून आणि त्यांच्या सांगण्यावरून धनराज मांढरे, संकेत मांढरे,अक्षय मांढरे, अर्जुन साळुंखे, हैदर सय्यद याच्यासह दोन ते तीन जणांनी आंदेकर चौकात वृषभ जाधव हा थांबलेला असताना त्याला कोयत्याने मारून जखमी केले होते. त्यानंतर त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून आप्पा मांढरे यांच्या मंगळवार पेठेतील घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत घेऊन गेले. त्या ठिकाणी देखील त्याला कोयत्याने मारहाण करून त्याचा आठ ते दहा जणांनी खून केला असल्याची फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून सर्व संशयित आरोपींना उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरुवारी रात्री ८च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत. वृषभ जाधवचा मृतदेह पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दारात..पोलिसांनी परिस्थिती हाताळली मृत वृषभ जाधव याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ८ वाजता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.खुनाच्या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सकाळी १०वाजून ४१ मिनिटांनी अंत्ययात्रा संगम माहुली येथे जात असताना नातेवाईकांनी अचानक पोवई नाक्यावरील पालकमंत्री देसाई यांच्या घराबाहेर मृतदेह ठेवत बैठक मांडली त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला,सुमारे ८ ते १० मिनिटे न्याय मागण्यासाठी मृतदेह गेटसमोर ठेवण्यात आला मात्र पोलिसांनी परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणून अंत्ययात्रा पुढील विधीसाठी पोलीस बंदोबस्तात रवाना केली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले,शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के,सचिन म्हेत्रे, अभिजित यादव यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JeKfubz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.