‘यह शहर इतना प्यारा है, मेरा इंतकाल हुआ तो मुझे यही दफना दो,’ असे वक्तव्य एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावरील सभेत केले होते. त्याला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘एक औरंगजेब आम्हाला महाग पडला. त्याने तसेच केले. नगरला मेला आणि इथे आला. आमचे शहर काही गोदाम आहे का? तिकडे जागा नाही का? अशा भावनिक वक्तव्यामुळे समाजात हालचाल निर्माण होते,’ असे शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भाषणात नेते भावनिक स्टेटमेंट करतात. त्यामुळे लोकांना वाटते ‘क्या बडा आदमी है. यहा दफन होना चाहता है.’ त्या माध्यमातून भावनिक वातावरण तयार करतात. भावनिक वक्तव्यामुळे समाजात हालचाल होते. त्यातून दंगली घडू शकतात, हे मी बोललो होतो. लोकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले होते, ही बाबही शिरसाट यांनी नमूद केली. हे तर जिवंतपणाचे लक्षण पक्षातील अंतर्गत संघर्षाबाबत विचारले असता, ‘आमच्यात वाद नाही. हे जिवंतपणाचे लक्षण आहे. नेतृत्वात पुढे जाण्याची स्पर्धा म्हणजे वाद नाही. आम्ही एकत्र आहोत. तिकीट कापल्याचे काहींना वाईट वाटले. सर्वांशी चर्चा केली. आता काही वाद नाही, असे त्यांनी सांगितले. शहरात काहीही घडू शकते दंगलीबाबत शिरसाट म्हणाले की, या शहरात काहीही घडू शकते. हे शहर संवेदनशील आहे. शहागंजमध्ये दगडफेक झाली, तर दुसरीकडे अफवा येते की दोन लोक मेले. अशा अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे, शांतता बाळगली पाहिजे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/UAs1ZRj
एक औरंगजेब आम्हाला महाग पडला, आमचे शहर गोदाम नाही -शिरसाट:संभाजीनगरात ‘दफन’ करावे, या ओवेसींच्या वक्तव्याला पालकमंत्र्यांचे प्रत्युत्तर
January 11, 2026
0