Type Here to Get Search Results !

कोंडाईबारी घाटात भीषण अपघात:रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला भरधाव कंटेनरची धडक, 15 प्रवासी होते, 8 जखमी

नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पोलिस चौकीजवळ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. बसच्या समोर आधीच एक ट्रक उभा असल्याने दोन्ही ट्रकांच्या मधोमध बस अक्षरशः चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता की कंटेनरच्या जबर धडकेत बस कॅबिन चेंदामेंदा झाली, तर ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचा संपूर्ण पुढील भाग उद्ध्वस्त झाला. बसचे लोखंडी भाग वाकडे-तिडके होऊन दृश्य अंगावर काटा आणणारे होते. या अपघातात नवापूर आगाराची बस क्रमांक एम एच 14 एम एच 1957 चे चालक महेंद्र लाजा गावित (रा. जामनपाडा, ता. नवापूर) यांच्या केबिनमध्ये पाय अडकले होते. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत मोठ्या प्रयत्नाने त्यांना बसमधून बाहेर काढले. अपघाताचे फोटो… बस वाहक संतोष बारसू सोंडे (रा. टाकळी, ता. भुसावळ) यांना पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जामनपाडा सरपंच प्रियंका जयवंत गावित यांचे बंधु मनोहर गावित यांनी आपल्या खासगी वाहनातून जखमींना तातडीने विसरवाडी रुग्णालयात दाखल करून माणुसकीचा आदर्श घडवला. या बसमध्ये एकूण १५ प्रवासी होते. त्यामध्ये नवापूर तालुका, चिंचपाडा, नवापूर शहर, साक्री तालुका तसेच सुरत, दहिवेल येथील प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील विसरवाडी पोलिस तपास सुरू आहे. अपघातात जखमी प्रवाशांची नावे -

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ztd0WUK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.