Type Here to Get Search Results !

अमरावती विद्यापीठ अजिंक्य पोटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम:'अन्वेषण-2026' मध्ये कृषी विज्ञान विभागात मिळवले यश

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी अजिंक्य पोटे याने आंतरराष्ट्रीय संशोधन महोत्सव 'अन्वेषण-२०२६' मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. अखिल भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्लीच्यावतीने शूलिनी विद्यापीठ, सोलन (हिमाचल प्रदेश) येथे ही स्पर्धा नुकतीच पार पडली. अजिंक्यच्या या यशाने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अजिंक्य पोटे याने 'ॲग्रिकल्चरल सायन्सेस' विभागात आपल्या उत्कृष्ट संशोधन सादरीकरणातून हे यश मिळवले. त्याच्या प्रकल्पाचे परीक्षक समितीने विशेष कौतुक केले. अजिंक्य हा राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणा येथे पीएच.डी. संशोधन करत आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड आणि आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांनी अजिंक्य पोटेचे अभिनंदन केले. त्यांनी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZLj8fNY

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.