पुण्यातील हडपसर येथील फुरसुंगी भागात चोरीचा आरोप झाल्याने एका २२ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतुलच्या भावाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल अहिरे एका खासगी ठिकाणी कामाला होता. आरोपींनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला होता. तसेच, आरोपींनी अतुलला मारहाण करून शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीमुळे आणि चोरीच्या आरोपामुळे अतुल नैराश्यात गेला होता. या मानसिक तणावाखाली अतुलने मध्यरात्री पुणे ते कोल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारून आपले जीवन संपवले. आरोपींच्या धमक्या आणि मारहाणीमुळेच भावाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; वर्गशिक्षीकेवर गुन्हा दाखल दुसरीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला आरडा ओरड करून त्याला हाताने पुस्तकाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलाच्या वर्गशिक्षीकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय अधिनियमचे कलम 75 व बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिकनीयम 2009 च्या कलम 17 (2), 115 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत घडला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KT7auIZ
चोरीच्या आरोपाने तरुण नैराश्यात:हडपसरमध्ये धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
February 25, 2026
0