Type Here to Get Search Results !

सोलापुरात ‘दिव्य मराठी’च्या बातमीनंतर खुलेआम मटका बंद:"खाकी'ला हप्ते तिथे सुरुच, पोलिस-राजकारण्यांच्या अभयामुळेच बुकींचे धाड

सोलापूर शहर व जिल्ह्यातील डान्सबारचा मुद्दा आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित करुन पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले होते. यानंतर ‘दिव्य मराठी’ने शहरात मटक्याचे अड्डे खुलेआम सुरु असल्याची बातमी २६ फेब्रुवारीच्या अंकात पुराव्यानिशी छापली. तरीही पोलिस प्रशासनाला जाग आलेली नाही. ‘दिव्य मराठी’तील बातमीच्या धाकाने काही बुकींना दिवसभर टपरी बंद ठेवले होते. तर काही ठिकाणी छुप्या रितीने, कुठे खुलेआम ओपन- क्लोजचा बाजार सुरुच असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत गुरुवारी दिसून आले. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत तेथील पोलिस निरीक्षकांनी मात्र दिवसभर कुठलीही कारवाई केली नाही. बुकींकडून नियमित ‘उत्पन्न’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस दाखवू शकले नाहीत. आयुक्तांनी मात्र या प्रकरणात गंभीर दखल घेतली असून, लवकरच धडक कारवाईचे आदेश देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिव्य मराठीत गुरुवारी मटक्याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बुकींनी सकाळपासूनच सावध पवित्रा घेतला. गुरुनानक चौक, सिव्हिलसमोरील टपरी, आणि भैय्या चौक येथील मटका घेणाऱ्या टपऱ्या बंद होत्या. पण टपऱ्यांच्या आडून आकडे घेण्याचे उद्योग सुरुच होते. काही पानटपऱ्यावर कारवाई टाळण्यासाठी कापड लावून आतमध्ये मटका घेतला जात आहे. पूर्वभागातील बुकींनीही आकडे घेणे बंद ठेवले होते. काही ठिकाणी चोरून होते. बातमीच्या धाकाने काही बुकींनी दिवसभर टपरी बंद ठेवली 24 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालिन पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुंची कोरवे गल्लीत छापा टाकून मटक्याचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करुन 40 जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी 28 जणांना जागेवर ताब्यातही घेतले होते. या रॅकेटचा सूत्रधार नगरसेवक सुनील कामाटी होता. तो हैदराबादेत पळून गेला होता. तिथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तसेच एक पोलिस स्टीफन स्वामी या धंद्यात पार्टनर असल्याचे सिद्ध झाले होते. त्यालाही अटक करुन निलंबित केले होते. तेव्हा या प्रकरणाशी संबंधित 288 जणांवर गुन्हे दाखल केल्याने मटका बुकींचे धाबे दणाणले होते. आतापर्यंत सोलापुरातील ही सर्वात मोठी कारवाई होती. त्यामुळे या धंद्यांना ब्रेकही लागला होता. मात्र कालांतराने पोलिसांचा धाक संपला. बुकींनी पुन्हा डोके वर काढले. पुन्हा हप्तेखोरी सुरु झाली. आता पुन्हा 2020 सालाप्रमाणे धाडसी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिस निरीक्षक म्हणतात, आमच्याकडे अवैध धंदे बंद माझ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद आहेत. कोणी मटका चालवत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. आढळले तर तातडीने कारवाई करुन या भागातील मटका शंभर टक्के बंद करण्यात येईल. नामदेव बंडगर, पोलिस निरीक्षक बझार पोलिस ठाण (त्यांच्या हद्दीतील गुरुनानक चौक, सिव्हिल परिसरात खुलेआम मटका सुरु होता.) जुगार, मावा, मटका बंद करा शिवसेनेच्या बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सायबण्णा तेग्गेळी यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. सोलापूर हे कामगारांचे शहर आहे. येथे हजारो कुटुंबे रोजंदारीवर उदरनिर्वाह करतात. मटक्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर येत आहे. त्यामुळे जुगार, मटका, गुटखा बंद करा, असे निवेदनात म्हटले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/IOCMHui

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.