दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत चिंचोली शिंगणे येथील २७ वर्षीय विशाल प्रेमदास तायडे या युवकाचा भुलेश्वरी नदीच्या पुलावरून पडून जागीच मृत्यू झाला. अंजनगाव रोडवरील चिंचोली फाट्याजवळ वाहणाऱ्या भुलेश्वरी नदीवरील सुमारे तीस फूट उंच पुलावरून विशाल खाली नदीपात्रात पडला. काही जणांच्या मते, विशालला दारूचे व्यसन होते आणि दारूच्या नशेतच तो पुलावरून खाली पडला असावा. घटनेची माहिती मिळताच खल्लार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार रवींद्र बारड यांच्यासह विशाल हरणे, विजय निमकांडे, गोपाल सोळंके, व्यंकेश नाकील, सागर नागपुरे आणि माहुलकर यांनी पंचनामा केला. खल्लार पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Iha5VAo
27 वर्षीय तरुणाचा पुलावरून पडून मृत्यू:दर्यापूर तालुक्यातील भुलेश्वरी नदीजवळ घडली घटना
February 14, 2026
0