महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अतिरेकी कारवायांच्या संशयावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील एकूण २१ ठिकाणी छापे मारले. शनिवारी आणि रविवारी अत्यंत गोपनीयरीत्या एकाच वेळी ही शोधमोहिम राबवण्यात आली. कारवाईत एटीएसच्या पथकांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड या भागांतील १४ आणि अहिल्यानगरमधील ७ ठिकाणांची झडती घेतली. शोधमोहिमेत एटीएसने किमान १४ संशयितांची चौकशीही केली. महाशिवरात्रीसह सणासुदीच्या काळात राज्यात जातीय तेढ निर्माण करणे किंवा घातपाताचा कटाचा गुप्तचर यंत्रणांना संशय होता. म्हणूनच एटीएसकडून संशयितांच्या घरांची,कार्यालयांची झडती घेण्यात आली. उशिरापर्यंत कोणालाही अटक केलेली नव्हती. शहरी तरुणांना कट्टरवादी बनवण्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचे कारस्थान उच्चशिक्षित तरुणांना सोशल मीडिया व इतर माध्यमातून अतिरेकी विचारांकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय आहे. हे तरुण आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते हा याचाही तपास केला जात. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात ही ‘क्लीनअप’ मोहीम राबवण्यात आली. पुसद-उमरखेडच्या १४, अहिल्यानगरच्या ७ ठिकाणी धाडी यवतमाळ | एटीएसप्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांनी यवतळमाळच्या पुसद शहरातील पार्वतीनगर परिसरासह १३ ठिकाणी आणि उमरखेडमधील ताजपुरा वॉर्ड परिसरातील एका संशयिताच्या घरावर अशी एकूण १४ ठिकाणी एटीएसच्या विशेष पथकांनी छापे मारले. या वेळी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. अहिल्यानगर | शहरातील मुकुंदनगर व सावेडी उपनगरातील सूर्यनगर परिसरात मुंबई आणि नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने ७ ठिकाणी छापे मारत तब्बल १२ तास झडती घेतली. काही तलवारी, चाकू व एक एअरगनही जप्त केली. जप्त शस्त्रांबाबत अमीर हमजा जफर शेख, असद जुबेर सय्यदविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. दस्तऐवज, लॅपटॉप, सीसीटीव्ही पुराव्यातून तपासाची दिशा एटीएसने छापेमारीत अनेक कागदपत्रांसह मोबाइल फोन, लॅपटॉप व पेनड्राइव्ह जप्त केले आहेत. संशयास्पद आर्थिक व्यवहार, कट्टरपंथी साहित्य हस्तगत केले आहे. संशयितांच्या भेटीगाठींसंबंधी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग्ज ताब्यात घेतल्या आहेत. यातून तपासाला नवी दिशा मिळू शकते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/IBFrapj
धाडसत्र:‘अतिरेकी कट’प्रकरणी यवतमाळ,नगरसह 21 ठिकाणी एटीएस छापे, तरुणांचे ब्रेनवॉश करून सणासुदीला घातपाताच्या कटाची शक्यता
February 15, 2026
0