Type Here to Get Search Results !

सरपंचपदासाठी 3 अपत्ये अडथळा; पित्यानेच केली मुलीची हत्या:नांदेडचा निर्दयी पिता तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात

सरपंचपदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी निर्दयी पित्याने पोटच्या मुलीचा जीव घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यात २९ जानेवारी रोजी घडली होती. केरूर (ता.मुखेड) येथील रहिवासी पांडुरंग कोंडामंगले याने आपल्या मुलीस कालव्यात फेकून दिले होते. यात प्राची कोंडामंगले (६) या बालिकेचा मृत्यू झाला. संशयिताला तेलंगणातील बोधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे सलूनचे दुकान आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंचपदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी करत होता. मात्र त्याला तीन अपत्ये असल्याने नियमानुसार अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने चिमुकल्या प्राचीला संपवण्याचा निर्णय घेतला. २९ जानेवारीला पांडुरंग कोंडामंगले याने बोधन येथे साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे सांगून प्राचीला सोबत घेतले. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कालव्यात त्याने मुलीला फेकून दिले. तसे काहीच घडलेच नाही, अशा आविर्भावात तो घरी परतला. दुसऱ्या दिवशी कालव्यात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात मुलगी पित्यासोबत गेली होती, अशी माहिती मिळाल्याने तेलंगणातील बोधन पोलिसांनी संशयित पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्ह्याचा खरा प्रकार समोर आला. ३० जानेवारीला बोधन पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले याला अटक केली. नंतर जन्मल्यास सूट महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक विशेष नियम आहे. या नियमानुसार दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकत नाही. परंतु नियमात असेही म्हटले आहे की जुळी मुले मग ती आधी जन्माला आली किंवा नंतर जन्मली असल्यास त्यांना या नियमातून सूट आहे. याचा अर्थ असा की जुळ्या मुलांसह एकूण तीन मुले असतील तर ते निवडणूक लढवू शकतात.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/kclhGsf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.