Type Here to Get Search Results !

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे घरोघरी प्रचाराचे निर्देश:पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी पुणे येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे, तसेच छोट्या बैठका आणि मेळाव्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. स्थानिक पातळीवर प्रभावीपणे प्रचार करण्यावर त्यांनी भर दिला. प्रचारासाठी प्रदेश स्तरावरील कोणताही मंत्री किंवा पदाधिकारी येणार नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळावी, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विविध विकासकामांची आणि शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपची बूथ यंत्रणा सक्षम असून, त्या माध्यमातून प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची मेहनत आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार यामुळे पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राजेश पांडे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारातून माघार घेतली आहे.मुख्यमंत्री यांच्या राज्यात 22 प्रचार सभा होणार होत्या मात्र त्या देखील रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/w1K7IBo

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.