Type Here to Get Search Results !

गावांमध्ये भरतायेत पर्यावरण शाळा; ग्रामस्थांकडून देणगीद्वारे वृक्षसंवर्धन:सोलापूरमधील 43 गावे आणि दोन तांड्यांवर हिरवळीचे क्षेत्र

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रमोद इंगळे खडकाळ जमिनीवर एक जंगल वाढवत आहेत. आधी येथे केवळ झुडपे वाढत होती. ही अशक्य वाटणारी कहाणी माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथील आहे. रोपे जिवंत ठेवण्यासाठी इंगळे झाडांच्या मुळांभोवती सुक्या उसाचे अवशेष पसरवत आहेत. यामुळे ओलावा टिकून राहतो. या कामात ते एकटे नाहीत; २५ गावकऱ्यांची टीम या १०० झाडांना वाचवण्याच्या मोहिमेत गुंतलेली आहे. ही एका गावाची कहाणी नाही. सोलापूर जिल्ह्यातील ४३ गावे आणि दोन तांड्यांवर आतापर्यंत ६,००० हून अधिक रोपे लावली आहेत. जतन केली आहेत. स्थानिक ग्रामस्थ वाढत्या तापमानाबद्दल चिंतेत आहेत. त्यांना माहीत आहे की पृथ्वीवर राहणे किती कठीण होईल. सोलापूरच्या गावांत आयोजित पर्यावरण शाळांमधून गावकरी हे सर्व शिकले. या शाळेत पर्यावरण, त्याचे संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपट दाखवले जातात. माजी आयआरएस अधिकारी विपुल वाघमारे म्हणाले, आम्ही ‘लेट्स प्लांट ए ट्री इन द माइंड’ या घोषणेसह लोकांना प्रशिक्षण देत आहोत. या मोहिमेअंतर्गत १० जणांची एक टीम ग्रामस्थांना हवामान बदलाच्या धोक्यांबद्दल व वृक्षारोपणाच्या गरजेबद्दल शिक्षित करते. त्यानंतर गावात १०० झाडे लावण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी ग्रामस्थांचा एक गट तयार केला जातो. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी धडपड अंजनगाव खिलोबा येथे ग्रामस्थ दर १० दिवसांनी देणग्या गोळा करतात आणि टँकरद्वारे झाडांना पाणी देतात. खरे तर प्रत्येक गाव लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी निधी गोळा करतो. प्रमोद इंगळे म्हणतात, “फक्त झाड लावणे पुरेसे नाही; त्यांचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या परिसराला व गावाला समृद्ध करण्यासाठी, पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे करत आहोत. झाडे राहिली तरच आमची मुले सुरक्षित राहतील. धुळे : वन संरक्षणासाठी रक्षक नियुक्त, स्वतःही सक्रिय; परिणामी बेकायदा वृक्षतोडही थांबली शिवप्रसाद शेवाळे, धुळे | धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर साक्री येथील वन संरक्षणासाठी रहिवाशांनी रक्षकांची नियुक्ती केली आहे. ते ११०० हेक्टरच्या डवण्यापाडा जंगलाचे रक्षणदेखील करतात. जंगलाचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या रक्षकांचे वेतन देण्यासाठी जंगलालगतच्या सात वस्त्यांमधील प्रत्येक घरातून दरवर्षी ३०० रुपये संकलित केले जातात. यामुळे बेकायदा वृक्षतोड थांबली. शिवाय हा उपक्रम लोकांच्या एकजुटीमुळे अतिक्रमणांनाही आळा बसला आहे. गावकऱ्यांनी वन समितीही स्थापन केली आहे. डवण्यापाडा समितीचे अध्यक्ष रामजी देसाई म्हणाले, पूर्वजांनी या जंगलाचे रक्षण केले. अतिक्रमणापासून संरक्षणासाठी आम्ही वन विभागाच्या मदतीने सात वस्त्यांची वनसंवर्धन समिती स्थापन केली. आम्ही सर्वजण मिळून देखभाल करतो. कायदा... कुऱ्हाडी घेऊन जाण्यास बंदी

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/vLJoPDZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.