Type Here to Get Search Results !

गणेश नाईक-एकनाथ शिंदे वाद मिटेना; श्रीकांत शिंदेंकडून प्रत्युत्तर:हिंमत असेल तर निवडणूक लढवण्याचे वनमंत्र्यांना दिले आव्हान

राज्यातील महायुतीमध्ये सध्या कुरबुरी सुरू असतानाच आता नवी मुंबईचे नेते वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. भाजप नेते गणेश नाईक यांनी नगरविकास विभागावर केलेल्या आरोपांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये बोलताना उत्तर दिले. “गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे, त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. त्यांना एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्याविरोधात मैदानात उतरून दाखवावे,” असे थेट आव्हान डॉ. शिंदे यांनी दिले आहे. नाईक आणि शिंदे यांच्यातील वाद मिटता मिटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आव्हानांना नाईक काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे. आमच्याच सरकारच्या नगरविकास खात्याने नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप नाईक यांनी केला आहे. “गप्प बसण्यासाठी मी मंत्रिपद स्वीकारलेले नाही,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. नवी मुंबईकरांचे भूखंड परत करा, अशी मागणीही त्यांनी केली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मंत्री नाईक यांच्या या आरोपांचा समाचार घेताना डॉ.शिंदे म्हणाले की, नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नवी मुंबईच्या जनतेने त्यांना अनेकदा ‘माजी’ केले आहे याचे भान त्यांनी ठेवावे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ते अशा प्रकारची खालच्या पातळीवरील टीका करत आहेत. मग कळेल कोणाचे पारडे जड खासदार शिंदे यांनी नाईकांना थेट निवडणुकीच्या रिंगणात येण्याचे आव्हान दिले. “तुम्हाला जर स्वतःच्या शक्तीवर एवढाच विश्वास असेल तर कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा किंवा तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही मतदारसंघातून आमच्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. मग कळेल कोणाचे पारडे जड आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी नाईकांची कोंडी केली आहे. वर्चस्ववादाची लढाई तीव्र गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यातील जुना संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. हा वाद वैयक्तिक टिकेपर्यंत पोहोचला आहे. नवी मुंबई आणि ठाणे पट्ट्यात आपलेच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून थेट आव्हान दिले जात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/XN6Tw79

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.