Type Here to Get Search Results !

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेचे बुकिंग सुरू होताच फुल्ल:रुक्मिणीच्या चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या होत्या 46 पूजा

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक ‘चंदन उटी’ पूजेला भाविकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या हंगामात उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व पूजांचे बुकिंग अत्यंत अल्प कालावधीत पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीने दिली. यंदा भाविकांच्या सोयीसाठी चैत्री यात्रा आणि अधिक मास वगळून विशिष्ट दिवसांचे नियोजन करण्यात आले होते. ​ ​मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी भाविकांकडून मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. सर्व बुक झालेल्या पूजा या मंदिर समितीने ठरवून दिलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार आणि पूर्ण धार्मिक विधीनुसार पार पडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवाच्या अंगाला थंडावा मिळावा म्हणून ही चंदन उटी पूजा करण्याची पुरातन परंपरा असल्याचे सांगण्यात आले. श्रींच्या मूर्तींना शीतलता लाभण्यासाठी परंपरा श्रींच्या मूर्तींना शीतलता लाभावी यासाठी परंपरा. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अथवा मृग नक्षत्र प्रारंभ होइपर्यंत श्री विठ्ठल व रुक्मिणीची पारंपरिक चंदन उटी पूजा केली जाते. विठ्ठलाच्या ४८ पूजा उपलब्ध होत्या. यासाठी प्रति पूजा २१,००० रुपये देणगी शुल्क निश्चित केले होते. भाविकांच्या ओघामुळे या सर्व पूजांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. श्री रुक्मिणी माता चंदन उटी पूजा माता रुक्मिणीच्या चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या ४६ पूजा उपलब्ध होत्या. याचे देणगी शुल्क प्रति पूजा ९,००० रुपये इतके होते. या पूजेलाही भाविकांनी मोठा प्रतिसाद देत सर्व कोटा पूर्ण केला आहे. अल्प कालावधीत बुकिंग पूर्ण झाल्याने भाविकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/R9nEvMK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.