Type Here to Get Search Results !

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मनपाने दीड कोटी विकास शुल्क माफ न केल्याने बसस्टँडची उभारणी रखडली; आता पीपीपी तत्त्वावर स्टँडच्या उभारणीचा प्रस्ताव

नागपूर आणि सोलापूर महापालिकांनी विकास शुल्क माफ केल्यानंतर तेथे सुसज्ज बसस्थानके उभारली. मात्र, छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दीड कोटी रुपयांचे विकास शुल्क माफ करण्यास नकार दिल्याने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा प्रकल्प गेल्या ६ वर्षांपासून रखडला आहे. आता हा प्रकल्प पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागतिक दर्जाची ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. घृष्णेश्वर मंदिरासह विविध पर्यटन स्थळांमुळे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक शहरात येतात. हे पर्यटक मोडकळीस आलेल्या मध्यवर्ती बसस्थानकावरूनच प्रवास करतात. दररोज सुमारे ७० हजार प्रवासी येथे ये-जा करतात, तर ५०० हून अधिक बस येथून सुटतात. पुणे, मुंबई, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील विविध शहरांसाठी येथून बससेवा उपलब्ध आहे. मात्र, या स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. स्वच्छतागृहातील अस्वच्छता, पार्किंगची कमतरता, मोडकळीस आलेली इमारत, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, परिसरातील खड्डे यामुळे बसस्थानकात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. सोलापूर, नागपूरमध्ये विकास शुल्क माफ नवीन बसस्थानकाची मागणी. १९९५ मध्ये पुढे आली होती. २०२१ मध्ये स्थानकासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्या वेळी मनपाने दीड कोटी रुपयांचे विकास शुल्क भरण्याची अट घातली. नागपूर आणि सोलापूरप्रमाणे विकास शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु मनपाने ती नाकारली. शुल्क भरावे लागते : मनपा मोजणी आॅफिसमध्ये शुल्क भरावे लागते. त्यामुळे बस स्थानक उभारणीसाठी विकास शुल्क भरणे गरजेचे होते. ही फाइल जुनी आहे. यावर वरिष्ठ निर्णय घेतील, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. ‘पीपीपी’चा प्रस्ताव बसस्थानकाचे नूतनीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पीपीपी तत्त्वावर बसस्थानक उभारण्याची योजना असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात येईल. - प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ स्थानक मंजुरीसाठी प्रयत्न बस स्थानकाचा विषय बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन आहे. परिवहनमंत्र्यांना भेटून अधिवेशनात बस स्थानकाचा मुद्दा उपस्थित करून मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहे. - संजय शिरसाट, पालकमंत्री

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/0SQtNrW

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.