Type Here to Get Search Results !

गॅरेजवर टायर बदलण्याचे काम सुरू असताना दोन जणांवर ॲसिड हल्ला:विष्णुनगर भागातील धक्कादायक प्रकार; गॅरेजमालक आणि ग्राहक गंभीर भाजले

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; मिठाईच्या दुकानातील पाण्यामुळे वाचले प्राण, तपास सुरू विष्णुनगर भागात रविवारी (८ मार्च) सकाळी एका गॅरेजवर टायर बदलण्याचे काम सुरू असताना अज्ञाताने गॅरेजचालक आणि ग्राहकावर ॲसिड फेकून त्यांना गंभीर जखमी केले. या भीषण हल्ल्यात गॅरेजमालकासह एक तरुण भाजला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिराज नजीर शेख (२६, रा. भारतनगर) आणि वैभव अनिलराव पुजदेकर (२८, रा. शेंद्रा) अशी जखमींची नावे आहेत. सिराज हे मागील ८ वर्षांपासून विष्णुनगर येथे एक गॅरेज चालवतात. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वैभव पुजदेकर हे आपल्या दुचाकीचे टायर बदलण्यासाठी गॅरेजवर आले होते. सिराज खाली बसून काम करत होते, तर वैभव शेजारीच खुर्चीवर बसले होते. सकाळी ११.१० वाजेच्या सुमारास अचानक एका अज्ञात व्यक्तीने सिराज यांच्या डाव्या बाजूने अंगावर ॲसिड फेकले. यामुळे सिराज यांच्या कपाळावर, गालावर, खांद्यावर, पाठीवर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या. याच वेळी बाजूला बसलेल्या वैभव यांच्याही डाव्या गालावर आणि हातावर हा पदार्थ उडाल्याने ते जखमी झाले. पाण्याच्या जारमुळे टळला मोठा अनर्थ हल्ला झाल्यानंतर अंगाची आग होऊ लागल्याने दोघांनी मोठा आरडाओरडा केला. प्रसंगावधान राखून त्यांनी शेजारीच असलेल्या मिठाईच्या दुकानातील पाण्याचे जार अंगावर ओतून घेतले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या पदार्थाच्या तीव्रतेमुळे दोघांच्या अंगावरील कपड्यांना मोठी छिद्रे पडली होती. घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. हे गॅरेज त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी या मुख्य रस्त्यावर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या वेळी तीन दुचाकी त्या परिसरातून जाताना दिसत आहेत. दिव्य मराठी अनुत्तरित प्रश्न मला काहीच समजले नाही मी गॅरेजवर दुचाकीजवळ उभा असताना अचानक चेहऱ्याची आग सुटली. कुणी पदार्थ फेकला हे दिसलेच नाही. तो पदार्थ अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे आम्ही तत्काळ पाण्याने आग शांत करण्याचा प्रयत्न केला. - वैभव पुजदेकर, जखमी ग्राहक

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CNy6LhR

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.